रावेर येथे चितोडे वाणी समाजाच्या वधू-वर परिचय मेळाव्यात १६० युवक-युवतींनी दिला परिचय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 02:37 PM2019-12-17T14:37:45+5:302019-12-17T14:39:37+5:30

वधू-वर परिचय सोहळ्याला येथील चितोडे वाणी समाज वधू-वर परिचय मेळावा समितीने नवा आयाम देत आयोजित केलेल्या वधू-वर परिचय मेळाव्यात १०० युवक व ६० युवतींनी परिचय सादर केला.

Interview with 3 youths at the Chitode Vani community bride at Raver | रावेर येथे चितोडे वाणी समाजाच्या वधू-वर परिचय मेळाव्यात १६० युवक-युवतींनी दिला परिचय

रावेर येथे चितोडे वाणी समाजाच्या वधू-वर परिचय मेळाव्यात १६० युवक-युवतींनी दिला परिचय

Next
ठळक मुद्देजागतिक मंदीच्या लाटेत आर्थिक स्थैर्य असलेल्या व्यावसायिकांना प्राधान्य द्या : प्राचार्य डॉ.दीपक रावेरकर वधू-वर परिचय मेळाव्यात ‘जुळूनी येती रेशीमगाठी’ या पुस्तकाचे प्रकाशन

रावेर, जि.जळगाव : दत्त जयंती रथोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक पद्धतीने साजरा होत असलेल्या वधू-वर परिचय सोहळ्याला येथील चितोडे वाणी समाज वधू-वर परिचय मेळावा समितीने नवा आयाम देत आयोजित केलेल्या वधू-वर परिचय मेळाव्यात १०० युवक व ६० युवतींनी परिचय सादर केला. किंबहुना जागतिक मंदीच्या लाटेत युवकांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळली असताना, आर्थिक स्थैर्य प्राप्त झालेल्या व्यावसायिकांना मुलींनी प्राधान्य देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पोलादपूर (महाड) येथील प्राचार्य डॉ.दीपक रावेरकर यांनी केले.
सरदार जी.जी. हायस्कूलच्या रंगमंचावर आयोजित समस्त चितोडे वाणी समाज वधू-वर परिचय मेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. सरदार जी.जी.हायस्कूलच्या गोपीचंद अग्रवाल रंगमंचावर हा चितोडे वाणी समाजाचा चौथा वधू-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता. मध्य प्रदेश, गुजरात व सबंध महाराष्ट्रातून चितोडे वाणी समाजातून रथोत्सवानिमित्त आलेल्या हजारो समाजबांधवांनी युवक-युवतींसह खच्चून गर्दी केली होती.
प्रारंभी, परिचय मेळाव्याचे अध्यक्ष प्राचार्य दीपक रावेरकर, कुसूंबा येथील वाणी समाजाध्यक्ष वामनराव वाणी, माजी उपनगराध्यक्ष अशोक वाणी, नायब तहसीलदार एन.जे.खारे, सरदार जी.जी.हायस्कूलचे मुख्याध्यापक शिरीष वाणी, रावेर पीपल्स बँकेचे निवृत्त व्यवस्थापक कैलास वाणी, नगरसेवक यशवंत दलाल, संगीता वाणी, रावेर शिक्षण संवर्धक संघाचे संचालक संचालक दिनकर पाटील, रावेर मर्चंटस को-आॅप बँकेचे चेअरमन संजय वाणी, गजानन भार्गव, पत्रकार राजेश यावलकर, चिवास वधू वर परिचय मेळावा समिती अध्यक्ष महेश अत्रे, उपाध्यक्ष नीलेश पाटील व उदयकांत वाणी आदी मान्यवरांचे हस्ते श्री गणेश पुजन करून व दीपप्रज्वलन करण्यात आले.
दरम्यान,चितोडे वाणी समाज वधू - वर सूचक ‘जुळून येती रेशीमगाठी’ हे पुस्तक प्रकाशन उभय मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक महेश अत्रे यांनी केले. यावेळी सरदार जी.जी.हायस्कूलचे मुख्याध्यापक शिरीष वाणी यांनी मनोगतात युवकांनी बदलत्या काळाच्या ओघात युवतींचा दृष्टीकोन बदलण्यासाठी व्यावसायिकतेत आमुलाग्र बदल करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, अध्यक्षीय भाषणात बोलताना प्राचार्य डॉ.दीपक रावेरकर पुढे बोलताना म्हणाले, वधू-वर परिचय मेळावा हे काळाची गरज ठरले असून, छोट्याशा वाणी समाजाचे अस्तित्व टिकवण्यासाठी युवकांनी प्रतिनिधित्व करण्याची बाब अभिमानास्पद आहे. समाजाची जणगणना करण्यासााठी वेबसाईट निर्माण करून नेटवर्किंग करण्याची काळाची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. त्यास पत्रकार राजेश यावलकर यांनी आपल्या मनोगतात त्यास दुजोरा दिला.
दरम्यान, १०० युवकांनी व ६० युवतींनी सुंदर, अनुरूप जोडीदार असण्याची अपेक्षा व्यक्त करून परिचय सादर केला. यावेळी प्राथमिक शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक असलेल्या रोशन रावेरकर यांनी आपला परिचय देताना संवैधानिक मूल्यांवर विश्वास असणारी व स्वत:ची वैयक्तिक भूमिका साकारून एकमेकांचे विचार जाणून घेणारी असावी, असा आगळावेगळा परिचय करून दिल्याने पालकांनी त्यांना प्रतिसाद दिला.
सूत्रसंचालन व आभार गिरीश पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पंकज खारूल, प्रशांत श्रावक, प्रमोद गजेश्वर, सुनील वाणी, सुनील व्ही.वाणी, अमोल पाटील, किरण वाणी, वैभव कौशिक, प्रशांत वाणी, गिरधर गजेश्वर, डी.एन.वाणी आदींनी अथक परिश्रम घेतले.

Web Title: Interview with 3 youths at the Chitode Vani community bride at Raver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.