किनगाव येथे मराठा समाज वधू-वर परिचय मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 12:33 AM2019-12-23T00:33:27+5:302019-12-23T00:36:02+5:30

किनगाव येथे राज्यस्तरीय मराठा समाज वधू-वर परिचय मेळावा रविवारी घेण्यात आला. यात जिल्ह्यासह राज्यातून आलेल्या सुमारे २५० विवाहेच्छुक युवक-युवतींनी व पालकांनी परिचय दिला.

Interview with the bride-to-be at Maratha Samaj in Kingaon | किनगाव येथे मराठा समाज वधू-वर परिचय मेळावा

किनगाव येथे मराठा समाज वधू-वर परिचय मेळावा

Next
ठळक मुद्देमेळाव्यात २५० युवक-युवतींनी दिला परिचयआजही शेती उत्तम-विलास पाटीलअनिष्ठ रुढींना फाटा द्या- जयश्री पाटील, तिलोत्तमा पाटील

यावल, जि.जळगाव : तालुक्यातील किनगाव येथे राज्यस्तरीय मराठा समाज वधू-वर परिचय मेळावा रविवारी घेण्यात आला. यात जिल्ह्यासह राज्यातून आलेल्या सुमारे २५० विवाहेच्छुक युवक-युवतींनी व पालकांनी परिचय दिला. त्यात समाजातील विधवा, घटस्फोटीत युवतींचाही समावेश होता. काही पालकांच्या संबंधाबाबत सकारात्मक बैठकाही पार पडल्या. किनगाव येथील युवकांनी एकत्रित येत येत या मेळाव्याचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी राष्टÑवादीचे माजी कार्याध्यक्ष विलास भाऊलाल पाटील होते.
राष्ट्रमाता जिजाऊचा वारसा घेत तालुक्यातील किनगाव येथील युवकांनी मराठा समाजातील लग्न पध्दतीची अवस्था बदलण्याच्या निर्धाराने आणि युवक-युवतींचा एकमेकांशी परिचय होऊन मनपसंतीचे संबंध व्हावेत या उदात्त हेतूने गावातील तरूणांनी या मेळाव्याचे नियोजन केले होते.
याप्रसंगी अमळनेरच्या राष्टÑवादीच्या जि.प.सदस्या जयश्री पाटील, जिल्हा बँकेच्या संचालिका तिलोत्तमा पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना समाजातील अनिष्ठ रुढींना फाटा देवून आधुनिक विचार प्रणालीचा अवलंब करण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर युवतीनी नोकरीवाला वर पाहिजे हा हट्ट धरण्यापेक्षा होतकरू, व्यावसायिक, प्रगतीशील व कष्टाळू शेतकरी यांनाही प्राधान्य देण्याचे आवाहन केले. मेळाव्यात सुमारे २५० युवक-युवतीनी आपला परीचय दिला. त्यात समाजातील विधवा, घटस्फोटीत युवतींचाही समावेश होता.
आजही शेती उत्तम-विलास पाटील
कार्यक्रमाचे अध्यक्ष विलास पाटील यांंनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, मूळात मराठा समाज शेतकरी आहे. आमच्या पूर्वजांनी उत्तम शेती, मधम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असल्याचे म्हटले आहे. आज समाजातील मुलांचा व पालकांचा कल नोकरदारांकडे आहे. मात्र स्वत:च्या शेतकरी मुलासाठी मुलगी शेतकरी पाहतात आणि मुलीसाठी नोकरदाराची मागणी करतात, ही अवस्था बदलावयास पाहिजे. आजही शेती व्यवसाय हा उत्तम आहे. समाजाने अनिष्ठ रुढी बंद कराव्यात. समाजाने समाजातील युवक-युवतीसाठी स्पर्धा परीक्षांचे वर्ग उघडावे. तसेच समाज प्रबोधन व तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित करावीत, असे आवाहन केले. लग्न मुहूर्त काढले जाते. मात्र लग्न वेळेवर लागत नाहीत तर मुहूर्त कशासाठी अशी विचारणा करत लग्नातील बडेजावपणाही कमी करावा. विनाकारण कर्ज काढून बडेजावपणा करू नये असे आवाहन पाटील यांनी केले.
व्यासपिठावर माजी आमदार रमेश चौधरी, विजयकुमार पाटील, अमळनेरच्या माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील, तिलोत्तमा पाटील, नवाबखा तडवी, पं.स.उपसभापती उमाकांत पाटील, गोकुळ पाटील, दिनकर पाटील, अनिल साठे, सरपंच टिकाराम चौधरी, नायगावचे सरपंच एल.व्ही.पाटील, भीमराव पाटील, डॉ.विजय बोरसे, विरावलीचे नानाजी पाटील, एकनाथ बुधा पाटील, रवींद्र ठाकूर, दहिगावचे ललित पाटील, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अजय पाटील यांच्यासह समाजातील जिल्ह्यातून आलेले मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक एम.एच.पाटील यांनी, तर सूत्रसंचालन एन. आर. पाटील यांनी केले.
आयोजक नंदकिशोर पाटील, उनिष पाटील, गुलाब पाटील, प्रमोद रामराव पाटील, उनिष कवठळकर, विनय पाटील, राजेंद्र पाटील यांच्यासह गावातील समाज बांधवांनी यशस्वतेसाठी परिश्रम घेतले.
अंध युवकानेही दिला परिचय
मूळचा किनगाव येथील रहिवाशी व सध्या जळगाव येथील एका बॅकेत लिपीक पदावर कार्यरत असेलला स्वप्नील भागवत पाटील या पदवीधर युवकाने आपला परिचय देताना वयाच्या १२ वर्षानंतर आंधळेपणा आल्याचे सांगून जिद्दीने नाशिक व पुणे येथे आपले शिक्षण पूर्ण करून इतिहास विषयात एम. ए केल्याचे सांगून वधूविषयी अपेक्षा व्यक्त केली.

Web Title: Interview with the bride-to-be at Maratha Samaj in Kingaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.