चिमुकल्या विद्यार्थिनीने घेतली मुख्याध्यापकांची मुलाखत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 08:10 PM2019-10-01T20:10:21+5:302019-10-01T20:10:48+5:30
जळगाव - शहरातील प़ऩलुंकड कन्या शाळेत दैनंदिन परिपाठ अंतर्गत आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला़ यामध्ये शाळेतील चिमुकल्या विद्यार्थिनींनी उत्कृष्ट संभाषण ...
जळगाव- शहरातील प़ऩलुंकड कन्या शाळेत दैनंदिन परिपाठ अंतर्गत आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला़ यामध्ये शाळेतील चिमुकल्या विद्यार्थिनींनी उत्कृष्ट संभाषण करित प्रत्यक्ष मुख्याध्यापिका साधना भालेराव यांची मुलाखत घेतली़
लुंकड कन्याशाळेत इयत्ता पाचवी तुकडी अ या वर्गाचा परिपाठ चिमुकल्या विद्यार्थिनींनी अतिशय आगळा वेगळा सादर केला. यावेळी या विद्यार्थिनींनी शालेय बातम्या, बोधकथा, सुविचार, दिनविशेष आदी विषयांचे सादरीकरण केले. वैष्णवी पाटील या विद्यार्थिनीने प्रत्यक्ष शाळेच्या मुख्याध्यापिका साधना भालेराव यांची मुलाखत घेतली. मुलाखतीत मुख्याध्यापिका यांचे बालपण, शालेय शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण, त्याचबरोबर त्याकाळात शिक्षणासाठी येत असणाऱ्या अडचणी काय होत्या व त्यांनी कशा सोडविल्या इत्यादी प्रश्न विचारून माहिती जाणून घेतली. यानंतर मुख्याध्यापिका साधना भालेराव यांनी विद्यार्थिनींसोबत संवाद साधला. यावेळी व्यासपीठावर शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका वंदना तायडे उपस्थित होत्या. या उपक्रमासाठी शिक्षक शिवाजी सोनवणे व दीपक पाटील यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.