मुलाखत - लवकरच होईल ‘त्या’ खटल्यांच्या कामकाजाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:12 AM2020-12-27T04:12:32+5:302020-12-27T04:12:32+5:30

जळगाव : मुदत संपूनही ठेवी परत न केल्यामुळे दाखल असलेल्या काही खटल्यांच्या कामकाजाला लवकरच बीएचआर प्रकरणासाठी नियुक्त करण्यात आलेले ...

Interview - Will be working on 'those' cases soon | मुलाखत - लवकरच होईल ‘त्या’ खटल्यांच्या कामकाजाला सुरुवात

मुलाखत - लवकरच होईल ‘त्या’ खटल्यांच्या कामकाजाला सुरुवात

Next

जळगाव : मुदत संपूनही ठेवी परत न केल्यामुळे दाखल असलेल्या काही खटल्यांच्या कामकाजाला लवकरच बीएचआर प्रकरणासाठी नियुक्त करण्यात आलेले विशेष न्यायाधीश आर. एन. हिवसे यांच्या न्यायालयात सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

मुदत संपूनही ठेवी न मिळाल्यामुळे महाराष्ट्रात सन २०१५ मध्ये बीएचआरच्या संचालक मंडळासह वरिष्ठ कर्मचाऱ्यांविरुद्ध ८१ केसेस दाखल करण्यात आल्या होत्या. या खटल्यांच्या सद्यस्थितीबाबत ‘लोकमत’ने जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांच्याशी संवाद साधला.

सन २०१५ मध्ये गुन्हे दाखल; २०१९ ला जळगावला खटले वर्ग

ठेवी न मिळाल्यामुळे महाराष्ट्रातील बीएचआरच्या त्या-त्या ब्रँचमधील ठेवीदारांनी संचालक मंडळासह वरिष्ठ कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. वाशिम, यवतमाळ, जालना, औरंगाबाद, बीड, नागपूर, पुणे, नाशिक, धुळे, जळगाव, कोल्हापूर, सोलापूर आदी जिल्ह्यांमध्ये गुन्हे दाखल होऊन खटले सुरू होते. त्यामुळे संशयित आरोपींना महाराष्ट्रातील वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये हजर करण्यात आले. मात्र, कालांतराने मुंबई हायकोर्टात रिटपिटिशन दाखल झाली आणि सर्व खटले जळगावला सन २०१९ मध्ये वर्ग करण्यात आले आहेत, असे अ‍ॅड. केतन ढाके यांनी सांगितले.

पुरवणी दोषारोपपत्र दाखल

महाराष्ट्रातील बीएचआर संचालकांविरुद्ध ८१ खटले जळगावात वर्ग झाले असून, त्यातील बऱ्याचशा खटल्यांमध्ये न्यायालयाने आरोप ठेवले आहे, तर काही खटल्यांमध्ये आरोप ठेवण्याचे काम सुरू आहे, असेही अ‍ॅड. केतन ढाके यांनी सांगितले. दरम्यान, या प्रत्येक खटल्यामध्ये पुरवणी दोषारोपपत्रसुद्धा दाखल झालेले आहे. लवकरच काही खटल्यांच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे. दरम्यान, बीएचआर प्रकरणासाठी न्यायाधीश आर. एन. हिवसे यांची विशेष नियुक्ती करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Interview - Will be working on 'those' cases soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.