वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ३९ रिक्त जागांसाठी केवळ ३ उमेदवारांनी दिल्या मुलाखती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 11:31 AM2019-11-14T11:31:39+5:302019-11-14T11:32:16+5:30
पहूर, बोदवड, रावेर रुग्णालयांना डॉक्टर मिळण्याची आशा
जळगाव : जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयांमध्ये रिक्त असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांसाठी बुधवारी मुलाखती घेण्यात आल्या. ३९ जागांसाठी या मुलाखती असताना केवळ तीनच उमेदवार आल्याने मुलाखती होऊनही जिल्ह्यात ३६ ठिकाणी वैद्यकीय अधिकाºयांची प्रतीक्षाच राहण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, मुलाखत झालेल्या तीन जणांना नियुक्ती मिळाली नसली तरी पहूर, बोदवड, रावेर ग्रामीण रुग्णालयांना वैद्यकीय अधिकारी मिळण्याची चिन्हे आहेत.
जिल्ह्यात आरोग्य विभागामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त जागांचा बिकट प्रश्न आहे. ग्रामीण रुग्णालयांसाठी ७१ वैद्यकीय अधिकाºयांचे पदे मंजूर असताना केवळ ४५ पदे भरलेली आहेत. त्यातही १३ वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्याने ३२ वैद्यकीय अधिकारीच कार्यरत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्याचा प्रश्न बिकट असून आरोग्य प्रशासनालाही डॉक्टरांसाठी मोठी कसरत करावी लागते.
त्यात काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे हे पहूर येथे गेले असताना त्यांना पहूर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी नसल्याचे आढळून आले होते. त्यानंतर त्यांनी जिल्ह्यात वैद्यकीय अधिकाºयांचे पदे भरण्याविषयी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आरोग्य विभागाच्यावतीने रिक्त पदांची माहिती जिल्हा प्रशासनाला दिली.
यामध्ये बुधवारी अस्थायी वैद्यकीय अधिकाºयांच्या ३९ जागांसाठी मुलाखती घेण्यात आल्या. मात्र यासाठी केवळ तीनच उमेदवार मुलाखतीसाठी आले. या तीनच उमेदवारांच्या मुलाखती जिल्हा निवड समितीच्यावतीने घेण्यात आल्या. यावेळी निवड समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.
तीन-चार दिवसात वैद्यकीय अधिकारी मिळण्याची शक्यता
तीन उमेदवारांच्या मुलाखती झाल्यानंतर आता निवडीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असून समिती सदस्यांच्या स्वाक्षºया होऊन त्यानंतर दोन-तीन दिवसात जिल्हाधिकाºयांची स्वाक्षरी होऊन तीन-चार दिवसात तीन ग्रामीण रुग्णालयांना वैद्यकीय अधिकारी मिळण्याची शक्यता आहे. यात पहूर, बोदवड, रावेर ग्रामीण रुग्णालयांना प्राधान्य राहणार असल्याचे समजते.
ग्रामीण भागात सेवेची तयारी ठेवा
राजकीय हस्तक्षेप, उपचारावरून वाद-विवाद, तोडफोड, मारहाण व इतर कारणांमुळे वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णलयांमध्ये जाण्यास इच्छुक नसल्याचे अनेक वेळा समोर आहे. अजूनही अशीच स्थिती असल्याने रिक्त जागा भरणे कठीण होत आहे. त्यासाठी वैद्यकीय अधिकाºयांना पूरक वातावरण राहून आरोग्य सेवाही मिळण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे व डॉक्टरांनीही ग्रामीण भागात सेवा देण्याची तयारी ठेवावी, असे आवाहन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.