शिंपी समाजाचा २९ डिसेंबरला राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 08:35 PM2019-11-23T20:35:01+5:302019-11-23T20:35:08+5:30
जळगाव - श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज हितवर्धक संस्थेतर्फे समस्त शिंपी समाज राज्यस्तरीय वधू-वर परीचय मेळाव्याचे २९ डिसेंबर रोजी ...
जळगाव- श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज हितवर्धक संस्थेतर्फे समस्त शिंपी समाज राज्यस्तरीय वधू-वर परीचय मेळाव्याचे २९ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता शहरातील बालगंधर्व खुले नाट्यगृह येथे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रकुमार सोनवणे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली़ मेळाव्यासाठी महाराष्ट्रासह देश-विदेशातून वधू-वरांनी नावनोंदणी केली असल्याचेही त्यांनी सांगितले़
समस्त शिंपी समाज राज्यस्तरीय वधु-वर परीचय मेळाव्याचे आयोजन अखिल भारतीय शिंपी समाज मध्यवर्ती संस्था संलग्न श्री क्षत्रिय अहीर शिंपी समाज हितवर्धक संस्था जलगाव शहर यांनी केले आहे. मेळाव्याची स्वागत समिती गठीत करण्यात आली असून स्वागताध्यक्ष म्हणून शरद बिरारी, उपाध्यक्ष दत्तात्रय कापूरे, अनिल खैरनार, कार्याध्यक्ष मुकुंद मेटकर, सचिव मनोज भांडारकर यांची निवडण्यात आली आहे. मेळाव्यात दिव्यांग वधू-वरांचे मोफत लग्न करून देण्याचा मानस असल्याचे यावेळी सांगण्यात आले. आतापर्यंत ४६७ वधू-वरांचे अर्ज प्राप्त झाले आहे. इच्छुकांना १५ डिंसेबरपर्यंत फॉर्म भरता येणार असून अधिकाधिक समाजबांधवांनी संपर्क साधावा असे आवाहन राजेंद्रकुमार सोनवणे यांनी केले आहे़