सायगाव परिसरात उसावर हुमनी रोगाचे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 10:00 PM2018-09-14T22:00:50+5:302018-09-14T22:03:47+5:30

चाळीसगाव तालुक्यातील सायगाव परिसरात पावसाने डोळे वटारल्याने सर्वच खरीप पिकांची स्थिती नाजूक बनली आहे. कपाशीवर लाल्या रोग पडला आहे. तर उसावर हुमनी (गांढरे) या रोगाचे अतिक्रमण झाले असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे.

 Invasion of Urmi Disease in Saiga Nagar area | सायगाव परिसरात उसावर हुमनी रोगाचे आक्रमण

सायगाव परिसरात उसावर हुमनी रोगाचे आक्रमण

Next
ठळक मुद्देगिरणा परिसरात पावसाअभावी पिकांवर रोगांची संक्रातऊसावरील हुमनी किडीच्या प्रभावाने मोठ्या नुकसानीची भिती

सायगाव ता. चाळीसगाव : सायगाव व संपूर्ण गिरणा परिसरात उसाच्या पिकाला गांढरे (हुमनी) नावाच्या रोगाच्या प्रादुर्भावाने ग्रासले असून शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला आहे. जेथे १०० टक्के येणारे पिक तिथे २० टक्के तरी मिळेल का नाही असा प्रश्न सध्या शेतकºयांपुढे निर्माण झाला आहे.
पावसाअभावी संकट
सायगांव व गिरणा परिसरात यंदा पावसाने दडी मारल्याने शेतकरी संकटात सांपडला आहे. दुसरे असे की, प्रत्येक शेतकºयाने कपाशी, ऊस, मका, ज्वारी, बाजरी अशी विविध पिके लावली आहेत. परंतु आज अशी संकटमय परिस्थिती आहे की, जेथे १०० टक्के येणारे पिक आज हातात येईल कि नाही असा प्रश्न सध्या शेतकºयांना पडला आहे. प्रत्येक पिकाला कोणत्या ना कोणत्या किडीने ग्रासले आहे. आणि पिकाला आज खरी गरज आहे ती पावसाची तथापि पावसाने डोळे वटारल्याने शेतकºयांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे . यंदा सायगाव व गिरणा परिसरातील शेतकºयांनी मोठया उत्साहाने उसाची लागवड केली होती. ज्यावेळी ऊसाची लागवड करत होते त्यावेळी विहिरीला पाणी देखील चांगल्या प्रकारे होते. परिसरांत सुरूवातीला थोड्या फार प्रमाणात पावसाने हजेरी देखील लावली. मात्र त्यानंतर पावसाने पाठ फिरविल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली. विहिरीची जलपातळी देखील घटली. परिणामी शेतकºयांनी लागवड केलेल्या उसाच्या पिकाबाबतीत त्याची द्विधा मनस्थिती झाली आहे .

 

Web Title:  Invasion of Urmi Disease in Saiga Nagar area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.