मुलांच्या आणि गरजूंच्या भविष्यात गुंतवणूक करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 04:02 PM2017-12-09T16:02:25+5:302017-12-09T16:03:04+5:30

जळगाव येथील मल्हार कम्युनिकेशन्स व रोटरी मिडटाऊन आयोजित ‘जगा आनंदाने मृत्यूनंतरही’ या उपक्रमातील सी. ए. अनिल शहा यांच्या भाषणाचा संपादित अंश वाचा ‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये.

Invest in the future of children and needy | मुलांच्या आणि गरजूंच्या भविष्यात गुंतवणूक करा

मुलांच्या आणि गरजूंच्या भविष्यात गुंतवणूक करा

Next

दोन प्रकारच्या प्रॉपर्टी आपल्याकडे असतात किंवा असू शकतात. एक म्हणजे स्व-कष्टार्जित आणि दुसरी म्हणजे वडिलोपार्जित. आपल्याजवळील लिक्विड प्रॉपर्टी (कॅश आणि सोन्याचा अपवाद वगळता) ज्यामधे बँक अकाऊंट, सेव्हिंग अकाऊंट, फिक्स डिपॉङिाट, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, एटीएम, प्रोव्हीडंट फंड, म्युच्युअल फंड, एलआयसी किंवा या प्रकारची कोणतीही इन्वेस्टमेंट इत्यादींचा समावेश होतो. या प्रकारची प्रॉपर्टीची विल्हेवाट किंवा नियोजन शक्यतो आपापसात चर्चा करून केले पाहिजे. आपल्याकडील बरीच मुले आता परदेशात नोकरीसाठी जातात. एक प्रश्न सहज आपल्या मनात येतो तो म्हणजे, जर एखाद्या व्यक्तीचा परदेशात मृत्यू झाला तर पुढे काय? अशावेळी परदेशातील डोमिसाईल कायदा लागू होतो. तेथील कायद्याची पूर्तता केल्यानंतरच पुढील सर्व व्यवहार किंवा देणी-घेणी पूर्ण करणे शक्य होते. त्याच्या बचत खात्यातील रक्कम त्याच्या नातेवाईकाला काढता येते. अलीकडे एक गोष्ट चांगली झाली आहे ती म्हणजे आता ऑनलाइन लॉकरमध्ये आपण आपले कागदपत्रे सुरक्षित ठेऊ शकतो. फिजिकल कागद आता तुमच्या हातात असलाच पाहिजे, अशी गरज त्यामुळे कमी होते. सरकारचे आता असे ऑनलाइन लॉंकर आहेत ज्यामधे आपण आपली कागदपत्रे सेव करून सुरक्षित ठेऊ शकतो. त्यामुळे आपला कुठलाही फिजिकल कागद हरवला तरी तो लॉकरमुळे परत मिळविता येवू शकतो. याचे रजिस्ट्रेशन कमी पैशांमध्ये करता येते. त्याला जास्त खर्च येत नाही. शेअर घेतले असल्यास त्याला वारसदार लावता येतो. वर्षात एकदा तरी आपल्या प्रॉपर्टीचा ऑनलाईन उतारा अवश्य काढून घ्यायला पाहिजे. म्युनिसिपल टॅक्स हा बांधलेल्या इमारतीसाठी असतो, तर बिनशेतसारा हा लँडसाठी असतो. हे दोघे भरणे आवश्यक असते. वर्षातून-दोन वर्षातून उतारे काढून घेणे आवश्यक आहे अन्यथा लँडमाफियाकडून आपली फसवणूक होण्याची शक्यता असते. सरकारी नोकरीमध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्वरित कागदपत्रांची पूर्तता करावी. जेणेकरून त्या व्यक्तीच्या नातेवाईकाला नोकारी देण्याचे प्रावधान आहे. त्याप्रमाणे नोकरी मिळविता येवू शकते. धंदादेखील एक प्रॉपर्टी आहे. तुमच्या मृत्यूनंतर तुमचे नातेवाईक धंदा सुरू ठेऊ शकतात. पण मृत्यूनंतर त्यात जे बदल घडतात ते सरकार दरबारी वेळेवर करून घ्यायला पाहिजे. प्रॉपर्टीला जॉईंट नाव लावता येते. पण धंद्याला अशी सोय अजूनतरी आपल्याकडे उपलब्ध नाही. पण आपल्या मृत्यूपत्रात आपण लिहू शकतो की, तुमच्यानंतर तुमचा धंदा कोण सांभाळणार? मृत्यू झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत सरकारी विभागांना याची माहिती दिली गेली पाहिजे. मृत झालेल्या व्यक्तीनंतर धंद्याची मालकी ट्रान्सफर करण्यासाठी त्या व्यक्तीचा पॅन नंबर संबंधित विभागाला कळवून वारसदार व्यक्तीचा पॅन नंबर देणे आवश्यक असते. म्हणून वारसदाराचा पॅन घेणे आवश्यक आहे. लायब्लिटीज दोन प्रकारची असू शकते. तुम्ही कुठल्याही फायनान्शियल इन्स्टिटय़ूशनकडून कर्ज काढलेले असते किंवा खासगी कर्ज काढलेले असते. पण एक मोलाचा सल्ला देईल की, खसगी कर्ज देऊपण नका आणि घेऊ पण नका. बँक लायबिलिटीमध्ये कर्ज घेतलेली व्यक्ती जर मृत पावली तर त्या कर्जाची परतफेड त्याच्या वारसदाराला करावी लागते. त्याचप्रमाणे टॅक्स रिकव्हरी शिल्लक असेल तर ती वारसदारकडून वसूल करता येते. मृत व्यक्तीने शेअर्स घेतलेले असल्यास ती व्यक्ती मृत झाल्यावर संबंधित कंपनीला त्याच्या मृत्यूबद्दलची माहिती द्या. सर्वात महत्त्वाचा आणि ब:याचदा विचारला जाणारा प्रश्न म्हणजे ‘गुंतवणूक कुठे करावी?’ कन्फ्युशियसचं एक छान वाक्य आहे, ‘जर तुम्हाला एक वर्षाचे गुंतवणूक करायची असेल तर धान्य पिकवा, जर तुम्हाला 10 वर्षासाठी गुंतवणूक करायची असेल तर झाड लावा आणि 100 वर्षाचे प्लॅनिंग करायचे असेल तर लोकांना शिक्षण द्या. ‘आज आपल्या आजूबाजूला अनेक गरजू लोक आहेत, त्यांना शिक्षणासाठी मदत करा, कारण तेच तुम्हाला नंतर तारतील. 2025 र्पयत पाण्याचा साठा संपणार आहे, असे भाकीत गुगलवर पहायला मिळते. त्यामुळे पाण्यासाठी आजच गुंतवणूक करायला पाहिजे. आज आपण आपल्या मुलांच्या हिश्श्याचे पाणी वापरतो आहे, पण त्यांच्यासाठी काही नियोजन करीत नाही, तेव्हा त्यांच्यासाठी पाण्याचे नियोजन करण्याची हीच योग्य वेळ आहे. पाण्याची बचत आणि त्यातील गुंतवणूक ही आज काळाची गरज आहे. (क्रमश:)

Web Title: Invest in the future of children and needy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.