अन्वेषण राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत दोन विद्यार्थ्यांना पारितोषिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 11:42 AM2019-03-16T11:42:32+5:302019-03-16T11:42:38+5:30

शुभम पाटील व मनिषा चौधरी यांचे यश

Investigating awards to two students in the National Research Tournament | अन्वेषण राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत दोन विद्यार्थ्यांना पारितोषिक

अन्वेषण राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत दोन विद्यार्थ्यांना पारितोषिक

Next
ठळक मुद्देविद्यापीठाला मानाचा तुरा



जळगाव : गुजरात येथील गणपत युनिर्व्हसिटी येथे झालेल्या आठव्या अन्वेषण राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठच्या शुभम पाटील याने बेसिक सायन्स तर मनिषा चौधरी हिने सोशल सायन्स गटात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले आहे़ संपूर्ण भारतात प्रथम क्रमांकाचे दोन पारितोषिके प्राप्त करणारे हे एकमेव विद्यापीठ ठरले आहे.
१२ ते १४ मार्च या कालावधीत नवी दिल्ली येथील असोसिएशन आॅफ इंडियन युनिर्व्हसिटी यांच्यावतीने गुजरातमध्ये ही आठवी अन्वेषण राष्ट्रीय संशोधन स्पर्धा झाली. पूर्व विभाग, पश्चिम विभाग, दक्षिण विभाग, उत्तर विभाग आणि मध्य विभाग या पाच विभागांमधून जिंकून आलेले प्रत्येकी पंधरा विजेते या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाले होते. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा विद्यार्थी शुभम पाटील याने बेसिक सायन्स या गटात आणि मनिषा चौधरी या विद्यार्थिनीने सोशल सायन्स या गटात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले. महाराष्ट्रातील इतर विद्यापीठांपेक्षा प्रथम क्रमांकाचे दोन पारितोषिक पटकावून हे विद्यापीठ महाराष्ट्रात तर अग्रेसर राहिलेच यासोबतच देश पातळीवर देखील अग्रेसर राहिले. या स्पर्धेच्या फेरीत प्रत्येक गटातून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचे सुवर्णपदकासाठी पुन्हा सादरीकरण घेण्यात आले. त्यासाठी निवडण्यात आलेल्या पाच विद्यार्थ्यांमध्ये शुभम पाटील व मनिषा चौधरी या दोघांचा समावेश आहे. शुभम हा विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र प्रशाळेत एम.एस्सी. द्वितीय वर्षात शिकत आहे. या स्पर्धेत दिव्यांग लोकांसाठी त्याने तयार केलेले हिअरींग गॅझेट ठेवण्यात आले होते. जन्मत: ज्या लोकांना ऐकायला येत नाही अशा लोकांना दातांच्या कंपनाद्वारे ऐकायला येण्यासाठीचे संशोधन त्याने केले आहे. त्यासाठी त्याने मोबाईलमध्ये एक अ‍ॅप विकसित केले असून या माध्यमातून मोबाईलच्या अ‍ॅपमधून दातांमध्ये होणाऱ्या कंपनाद्वारे दिव्यांग लोकांना ऐकू येवू शकते. या संशोधनासाठी त्याने आतापर्यंत १२८ दिव्यांग मुलांवर व ६५ दिव्यांग प्रौढांवर प्रयोग केले.
स्वसंरक्षणार्थ पाण्याच्या बॉटलची निर्मिती
मनिषा चौधरी ही शेंदुर्णी येथील गरुड महाविद्यालयात द्वितीय वर्ष वाणिज्यची विद्यार्थिनी आहे. महिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी तिने महिलांच्या स्वसंरक्षणार्थ पाण्याची बॉटल तयार केली आहे. बेस्ट इमर्जन्सी डिफें डिंग इन्स्टश्वयमेंट असे या बॉटलचे नाव आहे. या बाटलीत पिण्याचे पाणी, कटर, टॉर्च, सायरन, जीपीएस, करंट बटन इमर्जन्सी मॅसेज सिस्टीम, आॅटोकॉल रिसिव्ह, चिलि स्प्रे या सारखे नऊ स्वसंरक्षणाचे गॅझेट बसविले आहेत. या बाटलीचे तिने पेटंट फाईल केले आहेत.

Web Title: Investigating awards to two students in the National Research Tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.