पाच दिवसात होणार ३९९ शिक्षकांच्या पदोन्नती प्रस्तावांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 08:00 PM2019-10-01T20:00:54+5:302019-10-01T20:03:31+5:30
विद्यापीठात शिबिराला सुरूवात : समितीचे असणार कामकाजावर लक्ष
जळगाव- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नअशासकीय अनुदानित महाविद्यालयांतील कार्यरत शिक्षकांसाठी उन्नत अभिवृध्दी योजनेंतर्गत पदोन्नतीच्या प्रस्तावाची छाननी करण्यासाठी आयोजित शिबीराला मंगळवारपासून प्रारंभ झाला. या शिबिरात ३९९ शिक्षकांचे प्रस्ताव तपासण्यात येणार आहे़
विद्यापीठाशीसंलग्न अशासकीय महाविद्यालयातील अध्यापकांचे उन्नत अभिवृद्धीयोजनेंतर्गत पदोन्नतीची प्रकरणे प्रलंबित असल्यामुळे त्याची कार्यवाही लवकरात लवकर व्हावी. यादृष्टीने पात्र शिक्षकांचे पदोन्नतीच्या प्रकरणावर कार्यवाही करण्यासाठी महाविद्यालयीनस्तरावर विद्यापीठामार्फत समिती देवून पुढील कार्यवाही केली जात होतीे. परंंतू प्रकरणांची वाढती संख्या पाहताअशा प्रकरणांचा त्वरेने निपटारा केंद्रीय पध्दतीने एकाच ठिकाणी व्हावा या दृष्टीने कुलगुरु प्रा. पी.पी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन करण्यात आले. कुलगुरुंंनी गठीत केलेल्या समितीच्या मार्गदर्शनाखाली समितीने सुचविलेल्या विविध बाबींंचा समावेश करुन विद्यापीठाच्या व्याख्याता मान्यता विभागाने गेल्या तीन महिन्या पासून नियोजन करुन महाविद्यालयाच्या आयक्युएसी समितीने पदोन्नतीसाठी शिफारस केलेल्या २१ विषयांसाठी ३३९ शिक्षकांची प्रकरणे या शिबिरात तपासण्यात येतील. शिबिराचे आयोजन १ ते ५ आॅक्टोंबर दरम्यान विद्यापीठाच्या कर्मचारी भवन येथे केलेले आहे. उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयातील प्रतिनिधी व व्यवस्थापन परिषद सदस्य हे प्रकल्पाच्या ठिकाणी प्रत्यक्ष जातीने हजर राहून कामकाजाचा आढावा घेऊन मार्गदर्शन करतील.
शिबीराचे उद्घाटन कुलगुरु प्रा. पी.पी. पाटील यांच्याहस्ते झाले. समन्वयन प्रा. ए.बी. चौधरी अधिष्ठाता यांनी केले. व्याख्याता मान्यताविभागाचे सहायक कुलसचिव आर.बी. उगले यांनी प्रास्ताविक केले़ नियम व शिबिराबद्दल माहिती डॉ. प्रशांत मगर, अमरावतीयांनी दिली. या प्रसंगीप्रा.पी.पी. पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. व्यासपीठावर बी.बी. पाटील, कुलसचिव, प्रा.ए.बी. चौधरी, अधिष्ठाता, दिलीप पाटील, प्रा.नितीन बारी, प्रा.जे.बी. नाईक, डॉ. प्रिती अग्रवाल हे व्यवस्थापन परिषद सदस्य तसेच प्राचायर् पी.पी. छाजेड, प्राचार्य पी.एम.पवार, बी.पी. पाटील, प्रा. संजय सोनवणे हे उपस्थित होते. आभार उपकुलसचिव जी.एन. पवार यांनीतर सूत्रसंचालन डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी केले.