प्राप्तीकर विभागाकडून जळगावात दुसऱ्या दिवशीही तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 12:23 PM2020-02-29T12:23:23+5:302020-02-29T12:24:01+5:30

जैन उद्योग समूहाचे व्यवहार सुरळीत, ‘प्राप्तीकर’चे कार्यालयही गजबजले

Investigation from the Income Tax Department on the next day in Jalgaon | प्राप्तीकर विभागाकडून जळगावात दुसऱ्या दिवशीही तपासणी

प्राप्तीकर विभागाकडून जळगावात दुसऱ्या दिवशीही तपासणी

Next

जळगाव : जैन उद्योग समुहासह त्यांच्याशी संबंधित असलेल्या ५० ठिकाणी प्राप्तीकर विभागाचे पथक पोहचल्यानंतर गुरुवारपासून ते तेथेच ठाण मांडून आहे. रात्री केवळ एक ते दीड तास विश्रांती घेत प्रत्येक ठिकाणी पथकाकडून सलग तपासणी केली जात आहे. शुक्रवारी तर प्राप्तीकर विभागाचे जळगावातील कार्यालयही अधिकारी-कर्मचाऱ्यांनी गजबजले होते.
प्राप्तीकर विभागातही फाईल
ठिकठिकाणी तपासणी सुरू असताना काही कागदपत्रे प्राप्तीकर विभागाच्या जळगावातील कार्यालयातही तपासण्यात येत आहेत. शुक्रवारी सकाळी अधिकाºयांचा मोठा ताफा वेगवेगळ््या फाईल तपासत होते.
या फाईल नेमक्या संबंधित व्यक्तींकडील होत्या की कार्यालयाकडे असलेल्या नोंदींची तपासणी होत होती, या बाबत मात्र माहिती समजू शकली नाही. दिवसभरही या ठिकाणी ये-जा सुरू होती. संध्याकाळी तर अधिकारी वेगवेगळ््या ठिकाणी जाण्यासाठी तयारी करीत होते व त्यांच्यासाठी वाहन देताना कोणत्या पथकाला कोणत्या क्रमांकाचे वाहन द्यायचे, याचीदेखील चर्चा सुरू होती.
कंपनीत सर्वाधिक अधिकारी-कर्मचारी
पथकात एकूण २०० जण असले तरी यातील बहुतांश जण कंपनीत तपासणी करीत असून इतर ठिकाणी चार ते पाच जण आहे.
शुक्रवारी संध्याकाळी प्रतापनगरातील डॉ. सुभाष चौधरी यांच्या रुग्णालयात आणखी दोन अधिकारी आले. त्यांनी अर्धा ते पाऊण तास थांबून माहिती घेतली व त्यानंतर ते तेथून निघून गेले. या वेळी बराच वेळ त्यांनी डॉ. चौधरी यांच्याशी चर्चा केली व अधिकाºयांना बाहेर सोडण्यासाठी डॉक्टर बाहेर आले होते.
उद्योग समूहाकडून पथकाला सहकार्य
२७ फेब्रुवारी २०२० पासून प्राप्तीकर विभागाचे अधिकारी हे जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.च्या जळगाव येथील मुख्य कार्यालय, विविध कारखान्यात नियमित असलेले सर्च आणि सर्व्हेसाठी आलेले आहेत. त्यांना कंपनीचे व्यवस्थापन व सर्व ठिकाणचे सहकारी सहकार्य करीत आहे तसेच कंपनीचे सर्व उत्पादने व व्यवहार सुरळीत आणि नियमित सुरू आहेत, असे कंपनीच्यावतीने कळविण्यात आले आहे.
महावीर बँकेत नियमित तपासणी
महावीर सहकारी बँक सुरू झाल्यानंतर २७ फेब्रुवारी रोजी प्राप्तीकर विभागाचे अधिकारी आलेले आहेत. नोव्हेंबर २०१६मध्ये नोटबंदी झाल्यानंतर संपूर्ण देशभर बँकांचे व्यवहार तपासणी सुरू आहे. त्याच अनुषंगाने महावीर बँकेत तपासणी सुरू होती. या तपासणीमध्ये बँकेचे सर्व व्यवहार तपासणीसाठी बँकेचे अधिकारी व कर्मचारी सर्वोतोपरी सहकार्य करीत आहेत. या तपासणी दरम्यान बँकेचे सर्व व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू आहे व राहतील, असे व्यवस्थापनाने कळविले आहे.
वरिष्ठ अधिकाºयांचा पथकात समावेश
या पथकामध्ये ‘रेंज-२’च्या अधिकाºयांचा समावेश असून पुरुष अधिकाºयांसह महिलांचाही त्यात समावेश आहे. यात बहुतांश जण नाशिक विभागातील असल्याची माहिती मिळाली. प्राप्तीकर विभागाच्या जळगाव कार्यालयातील अधिकारी हे या पथकाला सहकार्य करीत असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Investigation from the Income Tax Department on the next day in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव