जामनेरात कॉँग्रेसच्या पाठीशी विरोधकांच्या अदृश्य हातांचे बळ : जिल्हा प्रभारी विनायक देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 04:44 PM2017-12-27T16:44:45+5:302017-12-27T17:03:42+5:30
मुख्यमंत्र्यांनंतर मीच असे म्हणणाºया मंत्र्यांच्या मतदारसंघातील निवडणूक काँग्रेसने हिमतीने लढवावी, असा संदेश सर्वच पक्षांकडून येत आहे, या निवडणुकीत काँग्रेसच्या पाठीशी जिल्ह्यातूनच अदृश्य हातांचे बळ मिळणार आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हा प्रभारी विनायक देशमुख यांनी केले.
आॅनलाईन लोकमत
जामनेर, दि.२७ : मुख्यमंत्र्यांनंतर मीच असे म्हणणाºया मंत्र्यांच्या मतदारसंघातील निवडणूक काँग्रेसने हिमतीने लढवावी, असा संदेश सर्वच पक्षांकडून येत आहे, या निवडणुकीत काँग्रेसच्या पाठीशी जिल्ह्यातूनच अदृश्य हातांचे बळ मिळणार आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हा प्रभारी विनायक देशमुख यांनी केले.
जामनेर नगरपालिकेची निवडणूक मार्चमध्ये होणार आहे. या पार्श्वभूमीवर गांधी चौकातील मंगल कार्यालयात शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यात ते बोलत होते. राज्याचे राजकारण बदलविणारी निवडणूक म्हणून जामनेर पालिकेच्या निवडणुकीकडे पाहिले जाणार असल्याचे ते म्हणाले.
अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष अॅड.संदीप पाटील होते. सुरुवातीला माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी ही निवडणूक लढविण्यासंदर्भात आपली शिवसेना, मनसे व राष्ट्रवादीशी चर्चा झाल्याचे सांगितले. जिल्ह्याच्या सहप्रभारी डॉ. हेमलता पाटील यानी सांगितले की, नाशिक महानगरपालिका निवडणुकीत जामनेरचा पैसा ओतला गेला.
माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी सांगितले की, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात विकासकामांच्या नावाखाली डागडुजीचे कामे सुरू आहेत. माजी आमदार शिरीष चौधरी, महिला जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, ज्योत्स्ना विसपुते, शंकर राजपूत, अशपाक पटेल, गणेश झाल्टे, नगरसेवक जावेद मुल्ला, अनिस पठाण, शेख खालीद शेख रईस, रऊफ पठाण, पी.जे.सुरवाडे, गुणवंत हिवाळे आदींनी मनोगत व्यक्त केले.
मागील निवडणुकीत काँग्रेस आघाडीच्या चिन्हावर निवडून आलेल्यापैकी काही नगरसेवक हे भाजपात सहभागी झाले. या निवडणुकीत त्यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी खालीद शेख यांनी केली. बैठकीस डी.जी.पाटील, भगवान पाटील, मूलचंद नाईक, राजू भोईटे, रफीक मौलाना, प्रभू झाल्टे, अॅड.आर.एस. मोगरे, संतोष झाल्टे, इद्रीस पटेल, गोपाल राजपूत, रऊफ शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.