एन-मुक्ता वेबिनामध्ये राज्यभरातील संशोधकांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 03:13 PM2020-05-20T15:13:50+5:302020-05-20T15:13:56+5:30
जळगाव : अखिल भारतीय शैक्षिक महासंघ संलग्नित एन-मुक्ता जळगावतर्फे पाच दिवसीय वेबिनार मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. या वेबिनारचे ...
जळगाव : अखिल भारतीय शैक्षिक महासंघ संलग्नित एन-मुक्ता जळगावतर्फे पाच दिवसीय वेबिनार मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. या वेबिनारचे नुकतेच उद्घाटन झाले आहे. ही वेबिनार मालिका १८ ते २२ मे दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. विविध विषयांवर मार्गदर्शन केले जात आहे.
वेबिनारमध्ये पहिल्या दिवशी सोमवारी शिक्षक आणि सामाजिक जबाबदारी या विषयावर वक्ते आणि मुख्य प्रशिक्षक प्रा.सुरेश पांडे यांनी मार्गदर्शन केले. मंगळवारी कोविड-१९ नंतरचे शैक्षणिक प्रवाह या विषयावर आय.आय.टी. इंदौर येथील डॉ. प्रशांत कोड्गीरे यांनी यांनी सहभागींना मार्गदर्शन केले. वेबिनार मालिकेत बुधवारी कोविड काळात योग्य आरोग्य व आहार पद्धती जनजागृती या विषयावर जळगाव येथील आयुर्वेद तज्ञ डॉ.आनंद पाटील यांनी मार्गदर्शन केले़ आता गोवा येथील प्रमोद पवार हे शिक्षकांसाठी संधी आणि नवीन तंत्रेया विषयावर तर शुक्रवारी डॉ.योगेश पाटील हे कोविड काळात मुक्स व त्याचा वापर या विषयावर मार्गदर्शन करणार आहे.
यांची होती उपस्थिती
या पाच दिवसीय वेबिनार मालिकेचे उद्घाटक जयपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा अध्यक्ष अ.भा.रा.शै.म. यांच्या हस्ते झाले. वेबिनारसाठी प्रमुख अतिथी म्हणून कवयित्री बहिणाबाईचौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यपीठाचे यु.आय.सी.टी.चे संचालक प्रा.जे.बी. नाईक यांनी विद्यार्थ्यांप्रती असलेली भूमिका व जबाबदारी मनोगतातून स्पष्ट केली. यावेळी एन-मुक्ता जळगावचे अध्यक्ष नितीन बारी, सचिव प्रा.डॉ. अविनाश बडगुजर, समन्वयक डॉ. चंद्रशेखर वाणी, एम.डी. पालेशा, सहसमन्वयक डॉ. दिनेश भक्कड उपस्थित होते.
प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी सहभागी
पाच दिवसीय वेबिनार मालिकेत सुमारे २ हजार २०० प्राचार्य, प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी आदी सहभागी झाले आहे. या पाच दिवसीय मालिकेत दररोज दुपारी ४ ते सायंकाळी ६ यावेळेत तज्ज्ञ मार्गदर्शक आॅनलाइन मार्गदर्शन करत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. वर्डीकर यांनी केले.