गळ्यावर लोखंडी टॅमी ठेवून...चोरट्यांनी मार्केटिंग फेडरेशनची तिजोरीच लांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:20 AM2021-07-07T04:20:40+5:302021-07-07T04:20:40+5:30

जळगाव : शहरातील दूध केंद्रांवर दुधाचे वाटप करून आल्यानंतर विसनजी नगरातील जिल्हा मार्केटिंग फेडरेशन (जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा ...

With an iron tammy around his neck ... the thieves stole the Marketing Federation's coffers | गळ्यावर लोखंडी टॅमी ठेवून...चोरट्यांनी मार्केटिंग फेडरेशनची तिजोरीच लांबविली

गळ्यावर लोखंडी टॅमी ठेवून...चोरट्यांनी मार्केटिंग फेडरेशनची तिजोरीच लांबविली

Next

जळगाव : शहरातील दूध केंद्रांवर दुधाचे वाटप करून आल्यानंतर विसनजी नगरातील जिल्हा मार्केटिंग फेडरेशन (जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्था मर्यादीत) या संस्थेत येऊन झोपलेल्या वाहनचालकाच्या गळ्यावर लोखंडी टॅमी ठेवून जागेवरच गेम करण्याची धमकी देत संस्थेच्या कार्यालयातील अडीच लाखांची रोकड ठेवलेली तिजोरी, सीसीटीव्ही कॅमेरे व डीव्हीआर असा मुद्देमाल चौघांनी लांबविल्याची घटना मंगळवारी पहाटे पावणेचार वाजता घडली. दरम्यान, चारचाकी वाहनाने आलेले चारही चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विसनजी नगरात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन संस्थेचे कार्यालय असून या संस्थेमार्फत विकास दुधाचे शहरात वितरण केले जाते. रोज सकाळी साडेतीन वाजेपर्यंत संपूर्ण केंद्रावर दूध पोहोचविले जाते. त्यानंतर चालक हा संस्थेच्या कार्यालयात येऊन झोपतो. नेहमीप्रमाणे दुधाचे वितरण केल्यानंतर घनश्याम पंडित सोनार (वय ३८,रा.तुळजाई नगर) व त्यांचा भाचा पीयूष सोनार असे दोघे जण ३.१४ वाजता संस्थेत वेगवेगळ्या खोलीत झोपले.

तिजोरी फुटली नाही म्हणून ढकलत आणली बाहेर

सोनार गाढ झोपेत असताना ३.४५ वाजता बाहेर कोणी तरी दरवाजा ठोकल्याचा आवाज आला असता बाहेर बघण्यासाठी जात असतानाच चार जण आतमध्ये आले व त्यातील एकाने गळ्यावर लोखंडी टॅमी ठेवली हिंदीत संवाद साधून जागेवरच पडून राहा, नाही तर तुझा इथेच गेम करतो म्हणून दम दिला. त्यामुळे सोनार हे जागेवर तसेच पडून राहिले. एक जण तेथेच थांबून राहिला तर इतर तीन जण पुढे गेले. त्यांनी तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात त्यांना अपयश आले. इतर कपाटांची त्यांनी तपासणी केली. दरम्यान, नंतर चौघांनी मिळून दोन टन वजनाची तिजोरी ढकलत बाहेर आणली. जाताना त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा, दोन इंटरनेटचे राऊटर व एक युनीट मशीन असे साहित्य घेऊन चारचाकीतून निघून गेले.

पाच मीटरपर्यंत दाखविला श्वानाने माग

दरम्यान, या घटनेनंतर सोनार यांनी वॉचमन पाटील यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर डेपो प्रमुख मयूर पाटील व सहायक व्यवस्थापक भगवान पाटील यांना घटना कळविली. त्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता मंगळवारी बँकेत भरणा करावयाचे अडीच लाख रुपये तिजोरीत असल्याचे सांगितले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पेठ पोलिसांनी पहाटेच घटनास्थळ गाठले. श्वान पथकासह फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले होते. श्वानाने पाच मीटरपर्यंत चारचाकीजवळ माग दाखविला.

पोलीस अधीक्षकांकडून पाहणी

पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी सकाळीच घटनास्थळ गाठून संस्थेचे कार्यालय, तिजोरी कुठे असते, बाहेरील सुरक्षा व्यवस्था, दूध संकलन आदींची पाहणी करुन चालक सोनार याच्याकडून माहिती घेतली. संस्थेचे व्हाईस चेअरमन मुकुंदराव पाटील, संचालक रमेश जगन्नाथ पाटील, वाल्मीक पाटील व व्यवस्थापक विश्वनाथ पाटील यांच्याकडूनही त्यांनी माहिती जाणून घेत तपासी यंत्रणेला जागेवर बोलावून सूचना केल्या. दरम्यान, पोलिसांनी दुसऱ्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून चारही जण त्यात कैद झालेले आहेत. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: With an iron tammy around his neck ... the thieves stole the Marketing Federation's coffers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.