जळगावात महानगरपालिकेच्या वाहनावर फेकले लोखंडी माप; चालक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 12:20 PM2017-11-15T12:20:25+5:302017-11-15T12:22:15+5:30
काही काळ तणाव
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 15 - महापालिका अतिक्रमण निमरूलन विभागाचे पथक जप्ती कारवाई करत असताना भाजी विक्रेता कृष्णा सुभाष ठाकूर (वय 21) रा. वाल्मीक नगर याने तराजू काटय़ातील लोखंडी वजन माप ट्रकच्या दिशेने फेकले असता मनपा ट्रक चालक साजीद अली आबीद अली हे जखमी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. या घटनेनंतर काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, महापालिकेकडून शनिपेठ भागात नुरा बॅण्ड समोर काही विक्रेत्यांनी भाजी विक्रीच्या गाडय़ा लावल्या होत्या. या ठिकाणी मनपा अतिक्रमण निमरूलन विभागाचे पथक जप्ती कारवाईसाठी पोहोचले. कर्मचा:यांनी लोटगाडीवर भाजी विक्री करणा:या कृष्णा सुभाष ठाकुर याची भाजीची लोटगाडी जप्त करण्याचा प्रय} केला असता तो चिडला. घटनास्थळी यामुळे मोठी गर्दी झाली होती. कृष्णा याने रागात लोखंडी वजन ट्रकच्या दिशेने फेकले. हे वजन जप्ती कारवाई पथकातील ट्रकच्या काचेवर आदळून काच फुटली व वाहन चालक साजीद अली आबीद अली यांना छातीत दुखापत झाली.
काच लागल्याने रक्तही येत होते. मनपा अतिक्रमण निमरूलन अधीक्षक एच.एम. खान व अन्य कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. यानंतर सर्व शनिपेठ पोलिस स्टेशनला गेले होते. शनिपेठ पोलिसांनी कृष्णा ठाकुर विरूद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बी.बी. शिंदे करीत आहेत.