सिंचन विभाग चौकशीच्या फे:यात
By admin | Published: January 1, 2016 12:31 AM2016-01-01T00:31:30+5:302016-01-01T00:31:30+5:30
भुसावळ : विरोधी सरकारच्या काळात सिंचन विभागाला निधी मिळू शकला नाही.
भुसावळ : विरोधी सरकारच्या काळात सिंचन विभागाला निधी मिळू शकला नाही. हा विभाग घोटाळ्यांमध्ये अडकला आहे. चौकशा सुरू आहेत. चौकशींच्या फे:यात हा विभाग अडकला आहे, अशी भावना जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली. केळीची अवस्था वाईट आहे. भाव नाही. केळीला शास्वत भाव हवा आहे. केळीसाठी मुख्यमंत्री यांनी महामंडळ घोषीत करावे त्यामुळे केळीवर प्रक्रिया करता येईल, असेही महाजन यावेळी बोलताना म्हणाले. पालकमंत्री एकनाथराव खडसे यांच्यामुळे बंद असलेला हा महत्त्वांकाशी उद्योग सुरू झाला. आधुनिक सूतगिरणी सुरू झाली. यामुळे क्रांती झाली. रोजगार मिळेल. कापसाला भाव मिळेल, असेही ते म्हणाले. स्व.निखील खडसे यांचे स्वप्न या निमित्ताने पूर्ण झाल्याचे ते म्हणाले. सध्या शेतकरी अडचणीत आहे. कापसाला भाव नाही. शेतक:यांना मदतीचा हात दिला पाहिजे. शास्वत शेतीसाठी पाणी व वीज मिळाली पाहिजे. दहा हजार सौर ऊर्जा पंप शेतक:यांना दहा हजार सौर वीज पंप देण्यात येणार आहेत. त्यामुळे त्यांना वीज बिल भरण्याची गरज नाही. शेतकरी कष्टाळू आहे. बोदवड उपसा सिंचन योजना, कु:हा-वढोदा सिंचन योजना आहे. अनेक प्रकल्प अपूर्ण आहेत. ते प्राधान्याने सुरू करायचे आहेत. वरणगाव उपसा योजना वरणगाव उपसा योजना दोन महिन्यात सुरू होईल. या सर्व योजनांमुळे एक लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. अनेक प्रकल्प पूर्ण करायचे आहेत. मागच्या घोटाळ्यात हे खातं अडकल आहे.घोटाळे, अनियमितता फार झाली आहे. त्यामुळे चौकशीच्या फे:यात हे खात अडकले आहे. महाजन यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी करताना जलसंपदा विभागाला एकदाचे 40-50 हजार कोटी रुपये देऊन टाका. सात हजार रुपयांऐवजी 15 हजार कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद करा. वीज बिल माफी देऊ नका. पाणी आणि वीज द्या,अशी भावना त्यांनी व्यक्त केली. मेगा रिचार्ज बाबत बोलताना ते म्हणाले, हा प्रकल्प जगातील एक ‘अजुबा’ आहे. हा प्रकल्प सातपुडय़ातून जातो. महाकाय प्रकल्प आहे. मेगा रिचार्ज प्रकल्प चार महिन्यात सुरू व्हायला हवा़