वातावरणावर ठरतो मुलाचा चिडचिडेपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:31 PM2018-03-28T12:31:39+5:302018-03-28T12:31:39+5:30

The irritability of the child leads to the environment | वातावरणावर ठरतो मुलाचा चिडचिडेपणा

वातावरणावर ठरतो मुलाचा चिडचिडेपणा

Next

मानसशास्त्रीय दृष्टीने पाहता एखाद्या मुलाची चिडचिड होणे हे मानसिक अस्वास्थ्याचे लक्षण असते. हे अस्वास्थ्य अनेक कारणांमुळे असू शकते.
घरगुती वातावरण : घरातील वातावरण कसे आहे? यावरही मुलांचा चिडचिडपणा अवलंबून असतो. घरात वादविवाद सतत चालू असतील. मोठ्यांचे एकमेकांसोबत वारंवार खटके उडत असतील, कोणाचे दीर्घकालीन आजारपण चालू असेल तर त्याचा परिणाम मुला-मुलीच्या चिडचिडपणात झालेला पाहायला मिळतो.
आई-वडिलांचे परस्पर संबंध : आई-वडिलांचे परस्पर संबंध हे ताणलेले असतील, आईवडील विभक्त राहत असतील वा त्यांच्यात सतत वादविवाद होत असतील तर त्याचा विपरीत परिणाम म्हणून मुले चिडचिडी होऊ लागतात.
सततचे आजारपण : काही मुलांचे सतत हे ना ते दुखत असते किंवा एखादा दीर्घकालीन आजार मागे लागलेला असतो. त्यामुळे सारखे दवाखाने व उपचार चालू असतात. त्यामुळे मुले कंटाळून जातात व चिडचिड करू लागतात.
समायोजन समस्या : काही मुलांना परिस्थितीशी जुळवून घेणे अवघड जाते. याच्याशी पटत नाही, त्याच्याशी जुळत नाही, हा चांगला नाही, तोही चांगला नाही असा प्रकार चाललेला असतो. मूळ समस्या मुलाच्या व्यक्तीत्वात कुठेतरी दडलेली असते. त्यामुळे समायोजनाची समस्या उत्पन्न होऊन मुले चिडचिडी बनतात.
मानसशास्त्रीय समस्या : काही मुलांमध्ये चिंता, उदासीनता यासारख्या मनोवैज्ञानिक समस्या निर्माण झालेल्या असतात. कधी कधी तर तीव्र मनोविकार उत्पन्न झालेले असतात. त्यामुळे मुले चिडचिडी बनलेली असतात.
याशिवाय मुलाचे व्यक्तीत्व, अभिवृत्ती, स्वभाव व वरील यादीत समाविष्ट नसलेल्या पण व्यक्तिगत दृष्टीने महत्त्वाच्या घटना वा गोष्टी त्याच्या चिडचिडपणाच्या मुळाशी असू शकतात.
पालकांनी या सर्व बाबी ध्यानात घेऊन स्वत:च्या वागण्यात काही बदल करणे हितावह ठरते. घरातील वातावरणावरही अवलंबून असतो मुलांचा चिडचिडपणा.
आई-वडिलांच्या परस्पर संबंधांचा मुलांच्या वागण्यावर, चिडचिडपणावरही परिणाम होत असतो.
आपण बघतो काही मुलांचे हे आजारपण. कधी ते आजारपण यावरदेखील मुलाचा चिडचिडपणा अवलंवून असतो.
काही मुलांना त्याच्या परिसरातील परिस्थितीशी जुळवून घेणे खूप कठीण जात असते.
काही मुलांमध्ये चिंता आणि उदासीनता या समस्या निर्माण झालेल्या दिसतात. यावरदेखील चिडचिडपणा अवलंबून असतो.
मुलाच्या चिडचिडपणावर वारंवार भाष्य करणे टाळावे.
मुलावर चिडकाच असल्याचा शिक्का मारू नये.
मुलाला समजून घेण्याचा प्रयत्न करावा.
आपले काही चुकतेय का ते तपासावे.
मुलातील चिडचिडपणा वाढून पक्का होणार नाही यासाठी स्वत:त बदल करावे.
गरज असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
या बाबींचा खुबीने वापर केला तर मुलाचा चिडचिडपणा नियंत्रणात आणता येतो. (उत्तरार्ध)
- डॉ. नीरज देव

Web Title: The irritability of the child leads to the environment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव