आमदार फोडण्यात व्यस्त नसते तर इर्शाळवाडीची घटना टळली असती : अमित ठाकरे
By विलास.बारी | Published: July 20, 2023 10:13 PM2023-07-20T22:13:10+5:302023-07-20T22:13:31+5:30
संघटना पुनर्बांधणीसाठी जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी जळगाव शहरात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महाराष्ट्रात नेमके काय चालले आहे हे जनता बघते आहे. येत्या निवडणुकीत राजकीय पक्षांना याचे उत्तर मिळेल. सत्ताधारी आमदार फोडण्यात व्यस्त नसते तर इर्शाळवाडीची घटना टळली असती असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी केले. ते गुरुवारी, संघटना पुनर्बांधणीसाठी जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी जळगाव शहरात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
राज्यात सध्या जे काही घडते आहे त्यावरील प्रश्नावर बोलताना अमित ठाकरे म्हणाले, की महाराष्ट्रात नेमके चाललेय काय... मनसेने एक सही संतापाची ही मोहीम राज्यात राबवली. मतदार संतापला आहे, येत्या निवडणुकीत याचे उत्तर मिळेल. सरकार आमदार फोडण्यात व्यस्त नसते तर इर्शाळवाडीची घटना टळली असती. या संभाव्य घटनेबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आधीच भाकित केले होते. ते जर गंभीरपणे घेतले असते, तर आजची ही घटना घडली नसती असेही अमित ठाकरे यांनी स्पष्ट केले.