....अन् पुरातून अस्लम सहीसलामत आला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:34 AM2021-09-02T04:34:17+5:302021-09-02T04:34:17+5:30
कजगाव, ता. भडगाव : कजगावात आलेल्या तितूर नदीच्या पुराने हाहाकार माजविला. यात वीज खांबासह तोंडी आलेले पीक उखडून पुराच्या ...
कजगाव, ता. भडगाव : कजगावात आलेल्या तितूर नदीच्या पुराने हाहाकार माजविला. यात वीज खांबासह तोंडी आलेले पीक उखडून पुराच्या प्रवाहात वाहिले. मोठ्या प्रमाणात बळीराजाचे नुकसान झाले. याचा फटका येथील एक भोळसर मुस्लिम समाजाचा नागरिक अस्लम खाटीक यास बसला. मात्र, दैव बलवत्तर होते. म्हणूनच अस्लम सहीसलामत या महापुरातून बाहेर आला.
अस्लम हा नदीला पूर येण्याअगोदर नागद रस्त्यावर फेरफटका मारत असताना नदीला पूर आला नि या पुराने रौद्ररूप धारण केले व पुराचे रूपांतर महापुरात झाले. अस्लम पुरात घेरला गेला नि त्याच्या आजूबाजूने पुराचे पाणी वाहू लागले. अस्लम झाडाचा सहारा घेत झाडावर जाऊन बसला. भोळसर असल्याने पूर, पाणी याची समज नसल्याने तो त्या झाडावर निर्धास्त बसला. मात्र गावकऱ्यांचे ठोके पूर जसाजसा वाढत होता, तसतसे वाढत होते.
हा घटनाक्रम प्रशासनास कळविण्यात आला होता. शेवटी बाहेरगावचा एक रहिवासी सखाराम पावरा याने हिम्मत करत पाण्याच्या प्रवाहातून मार्ग काढत असतानाच अनिल पवार, अविनाश राजपूत, सोनू राजपूत, स्वप्नील राजपूत, कैलास राजपूत, शाम राजपूत हेदेखील अस्लमला बाहेर काढण्यासाठी पुढे सरसावले नि अस्लमला सहीसलामत बाहेर आणले.
310821\31jal_13_31082021_12.jpg
पुरातून बचवलेला अस्लम.