तणावात असलेल्या इसमाची गळफास घेवून आत्महत्या, खेडी आव्हाणे येथील घटना
By विजय.सैतवाल | Published: October 17, 2023 05:21 PM2023-10-17T17:21:34+5:302023-10-17T17:21:58+5:30
पत्नी, मुलासह खेडी आव्हाणे येथे राहणारे विलास सोनवणे हे गेल्या काही दिवसांपासून कोणत्यातरी तणावात होते.
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून कोणत्यातरी तणावात असलेले खेडी आव्हाणे येथील विलास श्रावण सोनवणे (५३, रा. खेडी आव्हाणे, ता. जळगाव) यांनी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना सोमवार, १६ ऑक्टोबर रोजी रात्री उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पत्नी, मुलासह खेडी आव्हाणे येथे राहणारे विलास सोनवणे हे गेल्या काही दिवसांपासून कोणत्यातरी तणावात होते. त्यात त्यांनी सोमवार, १६ ऑक्टोबर रोजी रात्री राहत्या घरात गळफास घेतला. हा प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर शेजारील मंडळींच्या मदतीने सोनवणे यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. याप्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिल फेगडे करीत आहे. मयताच्या पश्चात पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी आणि चार भाऊ असा परिवार आहे.