बोदवड जि.प.शाळेला आयएसओ मानांकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 12:10 AM2020-05-31T00:10:59+5:302020-05-31T00:12:00+5:30
मुक्ताईनगर तालुक्यातील बोदवड जिल्हा परिषद शाळेला भरीव व स्तुत्य उपक्रमाबद्दल आयएसओ मानांकन मिळाले आहे.
विनायक वाडेकर
मुक्ताईनगर, जि.जळगाव : एकीकडे इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे प्रस्थ वाढत असताना मुक्ताईनगर तालुक्यातील बोदवड जिल्हा परिषद शाळेला भरीव व स्तुत्य उपक्रमाबद्दल आयएसओ मानांकन मिळाले आहे.
मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीने आयएसओसाठी संस्थेकडे नोंदणी केली होती. आय.एस.ओ. निकषाच्या पूर्ततेसाठी शाळा व्यवस्थापन समितीची सभा घेण्यात आली घेण्यात आली. शालेय विकास कामाला दिशा मिळावी या हेतूने बुलढाणा जिल्ह्यातील धरणगाव व शिवणी या आयएसओ व प्रगत शाळांचा व्यवस्थापन समितीने अभ्यास दौरा करून शालेय कृती आराखडा तयार केला. शाळेच्या विकासाबाबत सभेमध्ये चर्चा करण्यात आली व विविध जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या. गावाला शाळेचा लळा लागला आणि न होणारी कामेही पटापट होऊ लागली.
गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके व केंद्रप्रमुख राजू तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील शिक्षक मित्रांचे प्रयत्न तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने या शाळेने ४५ निकषांची पूर्तता केली.
आज शाळेची पटसंख्या १८० असून, मुंबई व जळगाव येथील स्वयंसेवी संस्थेकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळाले आहे. शाळेला आयएसओ मानांकन प्राप्त झाल्याने बोदवड जि.प शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यामुळेच शिक्षण विभाग जळगाव तसेच शिक्षणतज्ज्ञ व महाराष्ट्र राज्य तंत्रस्नेही शिक्षक समूहाने विद्यार्थी, शाळा, िशक्षक व व्यवस्थापन समिती यांचे अभिनंदन केले आहे. आयएसओ मिळण्यासाठी मुख्याध्यापक सुनील बडगुजर, शिक्षक विजय बाºहे, नितीन धोरण, राम पाटील, योगेश जवंजाळ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विष्णू पाटील अध्यक्ष, उपाध्यक्ष अनुराधा पाटील, ज्ञानदेव मांडोकार, लहू घुळे, राजू पुरकर, शिवाजी सोनवणे, राजेंद्र न्हावकर, योगेश आंबेकर, कविता मोरे, उज्वला बावस्कर, मंदा सोनोने आदींनी परिश्रम घेतले.