वरणगाव नगराध्यक्ष निवडणुकीसाठी भाजपाच्या एका गटाकडून ‘व्हीप’ जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 04:42 PM2017-11-25T16:42:30+5:302017-11-25T16:46:57+5:30

वरणगाव नगराध्यक्ष निवडणुकीसाठी राजकारण तापले

Issue of 'VIP' from a BJP group for the post of President of Varangaon | वरणगाव नगराध्यक्ष निवडणुकीसाठी भाजपाच्या एका गटाकडून ‘व्हीप’ जारी

वरणगाव नगराध्यक्ष निवडणुकीसाठी भाजपाच्या एका गटाकडून ‘व्हीप’ जारी

Next
ठळक मुद्देवरणगाव नगराध्यक्ष निवडणुकीसाठी राजकारण तापलेगटनेते सुनील काळे यांनी केला नगरसेवकांसाठी व्हीप जारीभाजपाच्या दुसºया गटाच्या भूमिकेकडे लक्ष

आॅनलाईन लोकमत
वरणगाव, ता. भुसावळ,दि.२५ : वरणगाव येथील नगराध्यक्षपदाची निवडणूक जवळ आली आहे. निवडणुकीत कमालीची चूरस निर्माण झाली आहे. भाजपात सरळसरळ फूट पडली आहे. या पक्षाच्या एका गटाचे सदस्य सहलीला रवाना झाले आहेत, अशा स्थितीत या पक्षातील दुसºया गटाने व्हीप जारी केला आहे. त्यामुळे निवडणुकीत वेगळा रंग भरला जाण्याची शक्यता आहे.
नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पालिकेतील भाजपाचे गटनेते नगरसेवक सुनील काळे यांनी भाजपा नगरसेवकांसाठी पक्षाकडून व्हीप जारी करुन पक्षाच्या उमेदवारास मतदान करण्याचा आदेशच जारी केला आहे. त्यामुळे भाजपामधील नगरसेवकांची चांगलीच कोंडी झाल्याची राजकीय स्थिती निर्माण झाली आहे.
भाजपातील दुसºया गटाकडून काय पाऊले उचलली जातील याकडे तालुक्यातील राजकीय लोकांचे लक्ष लागले आहे. शुक्रवारीच व्हीप काढून तो पोस्टाने नगरसेवकांना पाठविण्यात आल्याची माहिती राजकीय सूत्रांनी दिली.
भाजपाचे तीन उमेदवार
नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपाकडून तीन उमेदवार मैदानात आहेत. त्यापैकी एका गटात दहा नगरसेवक दाखल झाले आहेत. ते तीन दिवसापूर्वीच सहलीला रवाना झाले आहेत. दरम्यान, दोन गटातील नगरसेवकांना एकत्र करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यातही सव्वा-सव्वा वर्षे विभागून देण्याच्या निर्णयावर एकमत न झाल्याने हाही फार्मुला फिसकटला आहे. एका गटाकडून पूर्ण अडीच वर्षे नगराध्यक्षपदावर राहण्याचा हट्ट धरण्यात आल्यामुळे एकमत होऊ शकले नाही.
राजकीय वातावरण तापले
गटनेते सुनील काळे यांनी त्यांना असेलेल्या अधिकाराचा वापर करुन पक्षाच्या नगरसेवकांसाठी व्हीप जारी केला आहे, मात्र असे करताना त्यांनी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा न केल्याने वरणगाव नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचे राजकीय वातावरण तापले आहे. यामुळे आता दुसरा गट पक्षादेश स्वीकारत २७ रोजी माघार घेतात की नवीन राजकीय व्यूहरचना करतात याकडे राजकीय धुरिणांचे लक्ष लागले आहे.
 

Web Title: Issue of 'VIP' from a BJP group for the post of President of Varangaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.