कजगाव, नागद रस्त्यातून बैलगाडी चालविणेही कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:18 AM2021-09-22T04:18:36+5:302021-09-22T04:18:36+5:30

कजगाव नागद हा मार्ग जळगाव जिल्ह्यातून मराठवाड्यात पोहोचण्यासाठी जवळचा मार्ग; मात्र या मार्गाची अवस्था इतकी खराब झाली आहे की, ...

It is also difficult to drive a bullock cart on Kajgaon, Nagd road | कजगाव, नागद रस्त्यातून बैलगाडी चालविणेही कठीण

कजगाव, नागद रस्त्यातून बैलगाडी चालविणेही कठीण

googlenewsNext

कजगाव नागद हा मार्ग जळगाव जिल्ह्यातून मराठवाड्यात पोहोचण्यासाठी जवळचा मार्ग; मात्र या मार्गाची अवस्था इतकी खराब झाली आहे की, या मार्गावर बैलगाडी चालवणेदेखील कठीण झाले आहे. कजगावपासून अवघ्या अकरा किलोमीटरवर मराठवाडा हद्द सुरू होते. मात्र, हा अकरा किलोमीटरचा रस्ता अंत्यत खराब झाल्याने या मार्गावरील सर्वच गावांतील ग्रामस्थांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. सदर मार्गाचे काम तत्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणी कजगाव, भोरटेक, पिंप्री, सार्वे, खाजोळेनेरी, वडगावसह सोयगाव व कन्नड तालुक्यातील अनेक गावांतील नागरिकांनी केली आहे. सदर रस्त्याचे काम तत्काळ मार्गी लावण्यासाठी पाचोरा-भडगावचे आमदार व कन्नडचे आमदार यांनी सयुक्तिक प्रयत्न करून सदर रस्त्याचे काम मार्गी लावावेत, अशी मागणी होत आहे.

फोटो कॅप्शन

कजगाव नागद मार्गाची झालेली दुरवस्था.

२२/२

Web Title: It is also difficult to drive a bullock cart on Kajgaon, Nagd road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.