ऑनलाइन परीक्षेच्या सरावासाठी मॉकटेस्ट देणे बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:13 AM2021-01-02T04:13:56+5:302021-01-02T04:13:56+5:30

जळगाव - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ मधील प्रवेशित विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने ५ जानेवारीपासून ...

It is mandatory to give mock test for online exam practice | ऑनलाइन परीक्षेच्या सरावासाठी मॉकटेस्ट देणे बंधनकारक

ऑनलाइन परीक्षेच्या सरावासाठी मॉकटेस्ट देणे बंधनकारक

Next

जळगाव - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ मधील प्रवेशित विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने ५ जानेवारीपासून सुरू होणार असून, ऑनलाइन परीक्षेच्या सरावासाठी मॉकटेस्ट देणे बंधनकारक आहे.

कला,विज्ञान व वाणिज्य पदवी, व्यवस्थापनशास्त्र अभ्यासक्रमांतर्गत सत्र- २, ४ व ६ या सत्रातील बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाइन एमसीक्यु स्वरूपात घेतल्या जाणार आहेत. ऑनलाइन परीक्षेचा सराव व्हावा यासाठी ४ जानेवरीपर्यंत विद्यार्थ्यांना मॉकटेस्ट देणे बंधनकारक आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ही मॉकटेस्ट देता येईल. विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी लॉगइनकरिता युजरनेम म्हणून पीआरएन नंबर टाकावा व त्यानंतर पासवर्ड म्हणून जन्मतारीख डीडीएमएमवायवाय या स्वरूपात नमूद करावी. सराव परीक्षेत लॉगिन झाल्यानंतर आपली शाखा निवडावी त्यानंतर अभ्यासक्रम निवडावा व त्या दिवशी वेळापत्रकानुसार जो विषय असेल तो निवडावा. प्रश्नाचे उत्तर निवडताना ए,बी,सी,डीसमोरील रेडिओ बटनवर क्लिक करावे. या पद्धतीने परीक्षा दिली तर कोणतीही अडचण निर्माण येणार नाही. काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास महाविद्यालयात नेमणूक करण्यात आलेल्या परीक्षा समन्वयकाशी संपर्क साधावा. या परीक्षेसंदर्भातील सविस्तर माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील होमपेजवर उपलब्ध आहे, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक बी.पी.पाटील यांनी दिली.

Web Title: It is mandatory to give mock test for online exam practice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.