विज्ञानातून चिरकाल टिकणारे योगदान देणे शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 03:10 PM2019-08-26T15:10:49+5:302019-08-26T15:12:19+5:30

युवा संशोधक डॉ़ दिनेश सावंत

It is possible to make a lasting contribution from science | विज्ञानातून चिरकाल टिकणारे योगदान देणे शक्य

विज्ञानातून चिरकाल टिकणारे योगदान देणे शक्य

Next


ज्ञान व महितीची सांगड घालणे अत्यंत महत्त्वाचे असते, लहानपणापासून संशोधन वृत्ती जोपासल्यास योग्य पद्धतीने मार्गक्रमण केल्यास एक उत्कृष्ट शास्त्रज्ञ बनण्यास तुम्हाला कोणी रोखू शकत नाही, - डॉ़ दिनेश सावंत
-------------------------------------------------------
आनंद सुरवाडे ।
जळगाव : ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये एक संशोधक दडलेला असतो, गरज असते त्यांना योग्य दिशा देण्याची मार्गदर्शनाची़ एकीकडे संशोधकांची उणीव भासते, मात्र दुसरीकडे अभियांत्रिकीकडे कल अधिक दिसतो़ विज्ञानात मोठ्या संधी उपलब्ध असून यातून देशासाठी चिरकाळ टिकणारे योगदान तुम्ही देऊ शकता, असे मत युवा शास्त्रज्ञ डॉ़ दिनेश सावंत (धुळे) यांनी व्यक्त केले़ जळगावात एका कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला़
प्रश्न : आपल्या संशोधक होण्याच्या प्रवासाबद्दल काय सांगाल ?
डॉ़ सावंत : धुळे येथील जय हिंद महाविद्यालयातून बीएस्सी केली त्यानंतर अहमदनगर येथून एमएस्सी केली़ घरची परिस्थिती अगदी बेताची होती़ मात्र शिक्षणावर भर होता़ कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून पीएच.डी. केली़ यात बेस्ट थेसीस अवार्ड मिळाला़ युवा संशोधन पुरस्कार मिळाला, जपानला प्रा़ रायोजी नयोरी यांच्या मार्गदर्शनाखाली संधोधनाची संधी मिळाली़ जर्मनीत एक वर्ष संशोधन केले़ त्यानंतर आयआयटी धनबाद येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत होते़
नुकतीच पुणे येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली़ संशोधन क्षेत्रात भरपूर संधी उपलब्ध असल्याचे बघून याबाबत सावंत इनोव्हेटीव्ह फाऊंडेशनच्या माध्यमातून अनेक महाविद्याल मार्गदर्शनपर व्याख्याने दिली जातात़

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी काय करावे
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्य सुप्त गुण असतात विज्ञानात मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे त्यांच्यापर्यंत पोहचणे गरजेचे आहे़ आज संशोधकांची उणीव भासते, त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास या क्षेत्रात ते स्वत:सह परिसराचे भविष्य उज्ज्वल करू शकतात़

संशोधनाचे देशसेवेत कसे महत्त्व आहे
विज्ञान हा एक अमुलाग्र घटक आहे़ आज विज्ञानाच्या प्रगतीमुळे अनेक अशक्य गोष्टी शक्य झाल्या आहेत़ प्रत्येक क्षेत्रात विज्ञानाचा वाटा असतो विज्ञानातून नवनवीन संशोधन करून देशहित साधता येते, देशाचे नावलौकिक होतो.

Web Title: It is possible to make a lasting contribution from science

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.