ढगाला लागली कळ!

By admin | Published: January 17, 2016 12:10 AM2016-01-17T00:10:22+5:302016-01-17T00:10:22+5:30

निसर्गाचा चकवा : तुरळक पावसाची हजेरी

It was cloudy! | ढगाला लागली कळ!

ढगाला लागली कळ!

Next

धुळे :जिल्ह्यात शनिवारी सकाळपासून ढगाळ हवामानानंतर शहरासह वर्शी, पिंपळनेर परिसरात पाच ते दहा मिनिटे तुरळक पाऊस झाला. जळगाव शहर परिसरातही सकाळी दोन वेळा पावसाचा शिडकावा झाला. त्यामुळे काढणीवर आलेल्या रब्बी पिकांचे नुकसान तसेच किडीच्या प्रादुर्भावाच्या शक्यतेने शेतकरी धास्तावले आहेत.

रब्बीची दादर, हरभरा, गहू ही पिके काढणीवर आली असून आता पाऊस झाल्यास त्यांचे मोठे नुकसान होणार आहे.

साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे संध्याकाळी 5.30 वाजता 10-15 मिनिटे तुरळक पाऊस झाला. शिंदखेडा तालुक्यातील वर्शी येथे सकाळी पाच मिनिटे तुरळक पाऊस झाला. धुळे शहरातही सकाळी तुरळक पाऊस झाला. संध्याकाळी वातावरण किंचित निवळले होते.

Web Title: It was cloudy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.