शिक्षण घेत असतानाचं संशोधन करणे महत्वाचे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 04:16 PM2019-10-24T16:16:21+5:302019-10-24T16:28:38+5:30
तरूण संशोधक अजिंक्य कोत्तावार : २१ पेटंट आहेत नावावर ; इंडिया बुक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंद
सागर दुबे !
जळगाव- प्रत्येकामध्ये संशोधक असतो, पण त्या संशोधन वृत्तीला चालणा मिळत नाही़ म्हणून आपल्या आवडींपासून ती व्यक्ती दूर जाते़ सध्या फक्त जादा गुण मिळविण्यासाठी शिक्षण घेतले जात आहे, असे पुस्तकी शिक्षण नकोचं. शिक्षण हे व्यवहारिक असले पाहीजे. त्यामुळे शिक्षण घेत असतांनाचं विद्यार्थ्यांनी संशोधन केल े.जे़ पुस्तकातील गोष्टी प्रयोगातून प्रत्यक्षात उतरविण्याचे प्रयत्न विद्यार्थ्यांनी केले पाहीजे, असे मत युवा संशोधन अजिंक्य रवींद्र कोत्तावार (यवतमाळ) यांनी व्यक्त केले.
रोटरी क्लब आॅफ जळगाव वेस्ट व आशा फाउंडेशन आयोजित ‘गप्पा इंडियाशी’ या कार्यक्रमानिमित्ते ते जळगावात आले असता ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला़ याप्रसंगी त्यांनी संशोधनाची आवड कशी निर्माण झाली त्याबाबतही माहिती सांगितली.
समस्या दिसली की, उपाय शोधायचो...
लहानणापासूनच शिक्षणाची आवडं नव्हती़ फक्त गुण मिळविण्यासाठी शिक्षण का घ्यावे? हा प्रश्न नेहमीच पडायचा.गावात हिंडत असताना मजुरांना काम करताना त्यांना येणाºया अडचणी बघायचो व त्या अडचणी कशा सोडविता येतील याचा विचार करायचो़ आणि उपाय काढायचो.आणि जेव्हा शास्त्रज्ञ हा शब्द ऐकला तेव्हापासून मला त्याचे कुतूहल निर्माण झाले होते.परंतु, शालेय शिक्षण घेतल्यानंतर शिक्षण न घेण्याचा निर्णय घेतला.पण, कुटूंबांनी समजूत घातल्यानंतर इंजिनिअरिंगपर्यंतचे शिक्षण घेतले. काळातच वर्गात कमी प्रयोगशाळांमध्ये मी अधिक रहायचो़ पुस्तकी ज्ञानापेक्षा पुस्तकातील गोष्टी मला प्रत्यक्षात उतरविण्याची आवडं, पर्यंत यश येत नाही.तोपर्यंत प्रयत्न करायचो़ त्यामुळे मला संशोधनात आवड निर्माण झाली.
आणि...पेटंट झाली नावावर...
पुस्तकातल्या गोष्टी प्रत्यक्षात प्रयोगातून उतरविण्यानंतर २०१३ मध्ये पहिले पेटंट नावावर झाले.नंतर २६ वर्षी १६ पेटंट असणारा भारतातील तरूण युवक ठरलो आणि इंडिया बुक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली.कल्पना येत गेल्या आणि त्या प्रत्यक्षात उतरवित गेलो आता मी २७ व्या वयात पदार्पण केले असून माझ्या नावावर २१ पेटंट असल्याची माहिती अजिंक्य कोत्तावर यांनी दिली.
शिक्षण हे व्यावहारिक असेल पाहीजे
शिक्षण पध्दतीत बदल होणे आता गरजेचे आहे.फक्त गुण घेण्यासाठी शिक्षण घेत आहात तर ते चुकीचे आहे़ शिक्षण हे व्यावहारिक असलं पाहीजे.परंतु, तसे होतांना दिसून येत नाही़ पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यावहारिक ज्ञानावर अधिक भर दिला पाहीजे.शिक्षण झाल्यानंतर अनेक जण नोकरी करतात़ राज्यात फक्त ९ टक््के नोकºया आहेत.त्यामुळे स्वयंरोजगारकडे विद्यार्थ्यांनी वळले पाहीजे.त्यांच्या कौशल्याचा तिथेच वापर केला पाहीजे व संकल्पना वापरायला हव्या, असेही अंजिक्य कोत्तावार यांनी सांगितले़ करिअरसाठी ६३६ क्षेत्र आहेत़ पण, विद्यार्थ्यांना मोजकेच माहिती आहे.त्यामुळे आपली आवड ओळखने महत्वाचे असल्याचाही सल्ला त्यांनी दिला.व ज्ञान फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील संशोधकवृत्तीला प्रोत्साहन देण्याचे ते काम करित असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोण आहेत ‘अजिंक्य कोत्तावार’
‘‘अजिंक्य रवींद्र कोत्तावर हे यवतमाळ जिल्ह्यातील पाटणबोरी येथील मुळचे रहिवासी. पाटणबोरी येथे ९ वीपर्यंत शालेय शिक्षण घेतल्यानंतर यवतमाळ येथे त्यांनी मॅकेनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले.या काळात संशोधन करून २६ व्या वर्षी १६ पेटंट नावावर करणारे ते देशातील तरूण संशोधन ठरले.सद्यस्थितीला २१ पेटंट त्यांच्या नावावर आहेत. आणि ज्ञान फाउंडेशनच्या माध्यामातून ते विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्तीला प्रोत्साहन देण्याचे काम करित आहेत.’’