जे. टी. महाजन फ्रुटसेल सोसायटीची सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:17 AM2021-09-19T04:17:31+5:302021-09-19T04:17:31+5:30
महाजन फ्रुटसेल सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच सोसायटीच्या सभागृहात घेण्यात आली. सर्वप्रथम जे. टी. महाजन ...
महाजन फ्रुटसेल सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच सोसायटीच्या सभागृहात घेण्यात आली. सर्वप्रथम जे. टी. महाजन (माजी गृहराज्यमंत्री) यांच्या अर्धाकृती पुतळ्याला संचालक ज्ञानदेव चोपडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. मृत संचालक स्वर्गीय दिलीप पितांबर बेंडाळे आणि सभासद व शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मागील सभेचे प्रोसिडिंग वाचन मॅनेजर किरण पाटील यांनी केले.
१ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ या मुदतीत संस्थेला जास्तीत जास्त केळी मालाचा पुरवठा करणाऱ्या पहिल्या चार सभासद यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व रोख बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात प्रथम क्रमांक - किशोर रमेश वाघुळदे , द्वितीय - शरद जीवराम महाजन, तृतीय- भोजराज विष्णू बोरोले, चतुर्थ - दिलीप वामन गाजरे यांचा समावेश आहे.
सभेला पी. डी. भारंबे, हुना इंगळे, गणपत नेहेते, हेमकांत वाघुळदे, पोपट चौधरी, हर्षद महाजन, भिकारी फिरके, जाहेरअली वारसअली, रमेश झोपे, सेवकराम चोपडे यांच्यासह व्हाईस चेअरमन सुभाष भंगाळे, संचालक भोजराज बोरोले, ज्ञानदेव चोपडे, किशोर वाघुळदे, किशोर तळेले, महेंद्र पाटील, सुजय महाजन, आरती महाजन, भारती भंगाळे, राजेंद्र भारंबे, मॅनेजर किरण पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन व्हाईस चेअरमन सुभाष भंगाळे यांनी केले. प्रकाश कोलते, धीरज वाघुळदे, प्रवीण चोपडे, राजेंद्र पाटील यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
180921\img-20210918-wa0029.jpg
संस्थेला केळी पुरवठा करणारे शेतकरी किशोर वाघुळदे यांचा सत्कार करताना पि.डि.भारंबे