सतपंथाचे जगन्नाथ महाराज

By Admin | Published: June 21, 2017 03:41 PM2017-06-21T15:41:51+5:302017-06-21T15:41:51+5:30

संत परंपरेने जनतेच्या मनावर खोलवर संस्कार केले आहेत.

Jagannath Maharaj of Satpanth | सतपंथाचे जगन्नाथ महाराज

सतपंथाचे जगन्नाथ महाराज

googlenewsNext

जगन्नाथ महाराज यांनी सतपंथीय अपप्रचार मोडून काढला. त्यासाठी प्रचंड पायपीट केली. चर्चा केल्या. महाराजांनी  सतपंथाचा ध्वज डौलाने फडकता ठेवला. महाराज या पंथाला वैदिक परंपरेतीला महत्त्वाचा दुवा सिद्ध करत होते.  महाराजांना हिंदी, संस्कृत, मराठी, इंग्रजी, या भाषा अवगत होत्या. 

प्रसिद्धीपरामुखता आणि एकांत प्रियतेमुळे त्यांचे संशोधन कार्य लोकांर्पयत अपेक्षित प्रमाणात पोहोचू शकले नाही.  महाराजांनी पंथाविषयीचे गढूळ जनमत बदलले. सतपंथाला जनताभिमुख केले. अध्ययन, संशोधन, लेखन आणि अध्यापन या चतु:सूत्रीवर त्यांचे जीवन आधारित होते. 
आज जिथे ‘सतपंथी संस्थान, फैजपूर धर्मशाळा’ अशी पाटी झळकते आहे तेथे चार शतकांपूर्वी असलेल्या देवळात सतपंथीयांचे देवघर होते. फैजपूरचे सतपंथी मंदिर भव्य आहे. दरवाजावर सुरेख कोरीव काम आहे. मंदिरावर दोन वेळा पांढरे निशाण चढवले जाते. गुढीपाडवा आणि 26 जुलै म्हणजे श्री पुरुषोत्तम महाराजांच्या पुण्यतिथीदिनी ते निशाण बदलले जाते. धर्मशाळेच्या वरच्या मजल्यावरचे ग्रंथालय दुर्मिळ ग्रंथांनी समृद्ध आहे. देवळात जिकडे नजर टाकावी तिकडे बोधवचने आणि अक्षरश: शेकडय़ांनी चित्रे आहेत. मंदिरातील चित्रे, त्यासोबतची माहिती आणि बोधवचनांच्या साहाय्याने एका ग्रंथाची निर्मिती होऊ शकेल एवढी सामग्री आहे. गीता तत्त्वज्ञानावर आधारित चित्रे, मोक्षमार्गाचा नकाशा, पंचमहायज्ञ, नवविधा भक्ती, चतुर्विध भक्ती, पंचविषय सेवन, देहाच्या चार अवस्था, मूळ बंधावर आधारित चित्रे, सत्त्व, रज, तम या त्रिगुणांवरील चित्रे अशी नाना विषयांवरील चित्रे इथे आहेत. पुरुषोत्तम महाराज ब्रrालीन झाले.  
 जगन्नाथ महाराजांनी महात्मा सद्गुरू इमामशहा महाराज या शीर्षकाने मौलिक ग्रंथांची रचना केली आहे.  लेखक म्हणून गुरूंच्या सन्मानार्थ  पुरुषोत्तम गुरू धर्मा महाराज असे नाव टाकले आहे. प्रस्तूत ग्रंथाला अकरा पृष्ठांची विवेचक अशी प्रस्तावना लाभली आहे. हे विवेचन जगन्नाथ महाराजांच्या व्यापक धर्मनिष्ठ प्र™ोचे निदर्शक आहे. सध्या हा ग्रंथ दुर्मिळ आहे. 
सर्वानी प्रकाशाच्या मार्गाने म्हणजे तेजस्वी अशा वैदिक सनातन मार्गाने कालक्रमणा करावी. कोणत्याही जाती, पंथ वा धर्माचे लोक का असेनात परमेश्वराला ते सारखेच प्रिय असतात. दु:खिताला मदत करणे हा परमेश्वराच्याच सर्वव्यापी धर्म असल्यामुळे त्याच्या अंमलबजावणीत भेदभाव करू नये. जगाचा परमेश्वर एकच असतो अणि परमेश्वराच्या धर्मही एकच असतो. ऐहिक जीवन सुखाचे करून परमार्थाचाही लाभ करून देणारा तो धर्म. संत परंपरेने जनतेच्या मनावर  खोलवर संस्कार केले आहेत.   
नदीच्या पाण्याने शेते पिकतात. त्याचप्रमाणे संतांच्या वचनाने जनतेच्या मनात सुविचारांचे, सद्भावनांचे, भक्तीचे मळे फुलतात. गुरुभक्ती, दया, क्षमा, शांती, या मानवाला उजळून काढणा:या पवित्र गुणांची शिकवण संतांनी दिली आहे. सर्वाभूती परमेश्वर ही भावना एकदा का आपल्या मनी दृढ झाली की उच्च-निच हा भेदभाव करणे कुणालाही शक्य होणार नाही. सारे जगच त्याला परमेश्वरमय दिसू लागेल.
 अशी मूलतत्त्वे जनतेच्या जीवनाशी तद्रूप होऊन जातात आणि आयुष्याच्या अखेर्पयत सत्य, शांती आणि प्रेम यांचा आचारधर्म सांडत नाहीत. सतपंथाच्या निमित्ताने मानवाला एक नवा उजाळा लाभला होता. आजही तो आपल्या पद्धतीने कार्यरत आहे. - प्रा.डॉ.विश्वास पाटील

Web Title: Jagannath Maharaj of Satpanth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.