जय गणेश फाउंडेशनची द्वारकाई व्याख्यानमाला यंदा ‘आॅनलाइन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 06:15 PM2020-07-24T18:15:03+5:302020-07-24T18:16:24+5:30

कोरोनाचे संकट असल्याने वैचारिक चळवळ प्रवाहीत राहावी म्हणून ही व्याख्यानमाला २९ ते ३१ जुलै दरम्यान आॅनलाइन घेण्यात येणार आहे.

Jai Ganesh Foundation's Dwarkai Lecture Series 'Online' This Year | जय गणेश फाउंडेशनची द्वारकाई व्याख्यानमाला यंदा ‘आॅनलाइन’

जय गणेश फाउंडेशनची द्वारकाई व्याख्यानमाला यंदा ‘आॅनलाइन’

Next
ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णयफिरत्या स्वरुपात असते व्याख्यानमाला

भुसावळ, जि.जळगाव : जय गणेश फाउंडेशन पाच वर्षांपासून ‘द्वारकाई’ व्याख्यानमाला हा सांस्कृतिक उपक्रम राबवत आहे. यंदा व्याख्यानमालेचे सहावे वर्ष आहे. कोरोनाचे संकट असल्याने वैचारिक चळवळ प्रवाहीत राहावी म्हणून ही व्याख्यानमाला २९ ते ३१ जुलै दरम्यान आॅनलाइन घेण्यात येणार आहे.
सुरभीनगरातील जय गणेश फाउंडेशनच्या कार्यालयात शुक्रवारी चार सदस्यीय कोअर कमिटीची बैठक फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून घेण्यात आली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.
माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांच्या मातोश्री द्वारकाई कालिदास नेमाडे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ही व्याख्यानमाला घेतली जाते. पाच वर्षांपासून ती दरवर्षी शहरातील तीन किंवा चार शाळा, महाविद्यालयांत फिरत्या स्वरुपात घेतली जात होती. यंदा मात्र, कोरोनाच्या संकटामुळे मर्यादा आल्या आहेत. मात्र, असे असले तरी हा उपक्रम खंडित होऊ नये व वैचारिक चळवळ प्रवाहीत राहावी म्हणून यंदाची ‘द्वारकाई’ व्याख्यानमाला झुम अ‍ॅप, वेबिनार, फेसबुक अशा विविध आॅनलाइन माध्यमांचा वापर करून घेण्याचे निश्चित करण्यात आले.
द्वारकाई आॅनलाइन व्याख्यानमाला कोअर कमिटीत माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, जय गणेश फाउंडेशनचे समन्वयक तथा रोटरीचे माजी अध्यक्ष अरुण मांंडाळकर, जिल्हा साक्षरता समितीचे सदस्य गणेश फेगडे, माजी नगरसेविका सुषमा नेमाडे यांचा समावेश आहे. येत्या दोन दिवसांत वक्त्यांंची नावे निश्चित करण्यात येतील. फाउंडेशनच्या कार्यालयात या उपक्रमासाठी खास व्हर्च्युअल कक्ष तयार करण्यात येत असल्याचेही त्यांनी या बैठकीत सांगितले.

Web Title: Jai Ganesh Foundation's Dwarkai Lecture Series 'Online' This Year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.