जिल्हाधिकाºयांच्या भेटीनंतर झाली सफाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 11:32 PM2017-07-26T23:32:46+5:302017-07-26T23:41:14+5:30

मंगळवारी अस्वच्छ असणाºया आदिवासी व मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहातील चित्र होते.

jailahaadhaikaaoyaancayaa-bhaetainantara-jhaalai-saphaai | जिल्हाधिकाºयांच्या भेटीनंतर झाली सफाई

जिल्हाधिकाºयांच्या भेटीनंतर झाली सफाई

Next
ठळक मुद्दे जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर शासकीय वसतिगृहाला अचानक भेट़ तुटलेल्या दरवाजांच्या चौकटी तिथेच पडूऩ सोलर सिस्टिमला लागून असलेल्या कोपºयात वायरी उघड्याच़


आदिवासी व समाजकल्याण वसतिगृह : पलंग उघड्यावरच, गुटख्याचे डाग कायम
आॅनलाईन लोकमत
अमळनेर, दि़ २६ - स्वयंपाकगृहाची खोली, आतील परिसरही स्वच्छ, फरशी फिनाईलच्या पाण्याने पुसलेली... हे दुसºया कुठल्या ठिकाणचे चित्र नव्हते, तर मंगळवारी अस्वच्छ असणाºया आदिवासी व मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहातील चित्र होते. असे असले तरी आदिवासी मुलांच्या वसतिगृहातील वरच्या मजल्यावर पलंग, गाद्या, तुटलेले दरवाजे उघड्यावरच पडलेले होते. खिडक्यांच्या बाजूला असलेल्या गॅलरीत मात्र गुटखा खाऊन थुंकलेले कायम होते. त्यामुळे येथील परिस्थितीत फारसा फरक दिसून आला नाही.
जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी मंगळवारी दुपारी समाज कल्याण विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहाला व लगतच्या आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहाला अचानक भेट दिली होती. त्या वेळी तेथे अस्वच्छता दिसून आल्याने, जिल्हाधिकाºयांनी नाराजी व्यक्त करीत त्याबाबतची शेरेबुकमध्ये नोंद केली होती.
या पार्श्वभूमीवर आज ‘लोकमत’ने या दोन्ही वसतिगृहाला भेट देत पाहणी केली.
सर्वप्रथम आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहाला भेट दिली. तेथे प्रवेशद्वाराजवळील परिसर, स्वयंपाकगृह या ठिकाणी स्वच्छता केलेली होती. मात्र, या ठिकाणी अन्न ठेवलेली भांडी अर्धवट उघडी ठेवलेली होती. मात्र, बेसीन चकाचक केलेले दिसून आले. मंगळवारी जिल्हाधिकाºयांना वरच्या मजल्यावर असलेल्या सोलर पॅनलवर कपडे वाळलेले टाकलेले दिसले, आज मात्र ती स्थिती नव्हती. परंतु या ठिकाणी पलंग, व गाद्या पडलेल्या होत्या. बाथरूमचे बांधकाम सुरू असल्याने, तुटलेल्या दरवाजांच्या चौकटी तिथेच पडून होत्या. तसेच सोलर सिस्टिमला लागून असलेल्या कोपºयात वायरी उघड्याच होत्या, विशेष म्हणजे त्याच ठिकाणी विद्यार्थी अंघोळ करतात. या वसतिगृहातील व्हरांड्यात गुटखा खाऊन थुंकलेले कायम होते, तर पाण्याच्या रिकाम्या बाटल्या पडलेल्याच होत्या. दरम्यान, या ठिकाणी एकही वर्तमानपत्र दिसले नाही. खिडक्यांची तावदाने फुटलेलीच होती. समाज कल्याण विभागाच्या वसतीगृहात फरशी फिनाईलच्या पाण्याने पुसून ठेवली होती. विद्यार्थ्यांच्या खोल्यांमध्येही स्वच्छता दिसून आली.

 

Web Title: jailahaadhaikaaoyaancayaa-bhaetainantara-jhaalai-saphaai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.