विनयभंग प्रकरणी वराडच्या तरुणास ६ महिने कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 02:30 PM2018-05-18T14:30:44+5:302018-05-18T14:30:44+5:30

घरात घुसून तरुणीचा विनयभंग करणाऱ्या संतोष देवीदास पाटील (रा.वराड, ता.धरणगाव) याला न्यायालयाने गुरुवारी सहा महिने सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

Jailed for 6 months in jail for molestation | विनयभंग प्रकरणी वराडच्या तरुणास ६ महिने कारावास

विनयभंग प्रकरणी वराडच्या तरुणास ६ महिने कारावास

Next
ठळक मुद्देसरकारी वकील चारुलता बोरसे यांनी प्रभावीपणे युक्तीवादसहा महिने सश्रम कारावास, दोन हजार रुपये दंडाची शिक्षाआरोपी पोलीस बंदोबस्तात कारागृहात रवाना

आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.१८ : घरात घुसून तरुणीचा विनयभंग करणाऱ्या संतोष देवीदास पाटील (रा.वराड, ता.धरणगाव) याला न्यायालयाने गुरुवारी सहा महिने सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात आरोपीविरुध्द अ‍ॅट्रासिटीचाही गुन्हा दाखल होता. त्यातही अशीच शिक्षा सुनावली आहे.
पीडित तरुणी एकटी घरात असताना २३ एप्रिल २०१० रोजी सकाळी ९ वाजता संतोष देवीदास पाटील हा तिच्या घरात गेला होता, तेथे तिच्याशी अश्लिल वर्तन केले होते. याप्रकरणी पीडित तरुणीने पाळधी दूरक्षेत्र येथे जाऊन तक्रार नोंदविली होती. त्यानुसार संतोष याच्याविरुध्द धरणगाव पोलीस स्टेशनला विनयभंग व अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा (गु.र.न.८८/१०) दाखल झाला होता.
अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश चित्रा हंकारे यांच्या न्यायालयात हा खटला चालला. त्यात सरकारपक्षातर्फे ९ साक्षीदार तपासण्यात आले. यात फिर्यादी तथा पीडित तरुणीची साक्ष महत्वाची ठरली.
सरकारी वकील चारुलता बोरसे यांनी प्रभावीपणे युक्तीवाद केला. हा युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपीला विनयभंग (कलम ३५४) व अनुसूचित जाती जमाती कायदा कलम ३ (१)(११) (अ‍ॅट्रासिटीच्या) गुन्ह्यात सहा महिने सश्रम कारावास, दोन हजार रुपये दंड, कलम ४५१ नुसार सहा महिने सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. सरकारतर्फे अ‍ॅड.चारुलता बोरसे व बचावपक्षातर्फे अ‍ॅड.अजय शिसोदिया यांनी काम पाहिले.
दरम्यान, शिक्षा सुनावल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर आरोपीला पोलीस बंदोबस्तात कारागृहात रवाना करण्यात आले.

Web Title: Jailed for 6 months in jail for molestation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.