डुडल आर्ट फेस्ट स्पर्धेत जैन इरिगेशनचे आर्स्टिस्ट विजय जैन व मिलींद पाटील यांना पुरस्कार
By admin | Published: May 2, 2017 03:14 PM2017-05-02T15:14:55+5:302017-05-02T15:14:55+5:30
डुडल आर्ट फेस्ट-२०१७ या स्पर्धेत जैन इरिगेशनचे आर्टिस्ट विजय जैन व मिलींद पाटील यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
Next
जळगाव, दि.२- मुंबई येथील ‘मंथन स्कूल’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या डुडल आर्ट फेस्ट-२०१७ या स्पर्धेत जैन इरिगेशनचे आर्टिस्ट विजय जैन व मिलींद पाटील यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
मुंबई येथील मंथन स्कूलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘डुडल फेस्ट’ या स्पर्धेत संपूर्ण भारतातून विविधस्तरातील कलाकार भाग घेतात. समाज प्रबोधनपर माहितीकरीता फोटोग्राफीक, टायपोग्राफीक, इलेस्ट्रेटीव्ह जाहिरातींची मांडणी करून स्पर्धेत प्रवेशिका पाठवित असतात. यावर्षी देशभरातील विविध कलाकारांनी प्रवेशिका पाठविल्या होत्या. त्यापैकी ५० कलाकृती प्रदर्शनासाठी निवडण्यात आल्या होत्या. त्यात जळगाव जैन इरिगेशनचे सहकारी विजय जैन व मिलींद पाटील यांच्या कलाकृतींना नामांकन मिळाले होते.
विजय जैन यांनी ‘सार्वजनिक स्वच्छतेचा भाग’ या विषयावर अतिशय मार्मिक स्लोगन तयार केले होते. यात प्रार्थनेच्या वेळी एका विद्यार्थ्याने केळीचे साल अन्य ठिकाणी न फेकता आपल्या पॅन्टच्या खिशात ठेवून स्वच्छतेचे भान ठेवले असा विषय मांडला होता. तर मिलींद पाटील यांनी अजाणत्या वयात केल्या जाणाºया विवाहाचे दुष्परिणाम दर्शविण्यासाठी समर्पक असे अपूर्ण वाढीचे शहाळे हे फोटोग्राफीक पद्धतीने मांडले होते. त्यात विजय जैन यांना प्रथम पुरस्कार म्हणून २५ हजार रुपये रोख व मानचिन्ह तसेच मिलींद पाटील यांना ‘ पब्लिक मोस्ट अॅप्रिशीएशन अॅवार्ड’ म्हणून प्रमाणपत्र व मानचिन्ह मुंबई येथील प्रसिद्ध छायाचित्रकार सुधारक ओलवे यांच्या हस्ते एका सोहळ्यात प्रदान करण्यात आले. या यशाबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी दोघा कलाकारांचे अभिनंदन केले आहे.