जैन स्पोर्ट्स, मू.जे.,उपांत्य फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 12:10 AM2017-08-27T00:10:07+5:302017-08-27T00:12:47+5:30

सेव्हन अ साईड फुटबॉल : मुलांच्या गटात इकरा स्कूल, अनुभूती उपांत्य फेरीत

jain sports,m.j. reach in semi final | जैन स्पोर्ट्स, मू.जे.,उपांत्य फेरीत

जैन स्पोर्ट्स, मू.जे.,उपांत्य फेरीत

Next
ठळक मुद्देमुलांच्या गटात इकरा स्कूल, अनुभूती उपांत्य फेरीतजैन स्पोर्ट्स अकॅडमीने उपांत्य फेरी गाठली


लोकमत न्यूज नेटवर्क 
जळगाव : ‘अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय’ मोहिमेंतर्गत जिल्हा फुटबॉल असोसिएशनने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय सेव्हन अ साईड फुटबॉल स्पर्धेत मुलींच्या गटात जैन स्पोर्ट्स अकॅडमी, मू.जे. महाविद्यालय, ए.टी. झांबरे विद्यालय, रायसोनी स्कूलने उपांत्य फेरी गाठली आहे. तर मुलांच्या गटात इकरा पब्लिक स्कूल, अनुभूती स्कूल, बाहेती महाविद्यालय आणि जैन स्पोर्ट्स अकॅडमीने उपांत्य फेरी गाठली.
या स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी सकाळी जिल्हा क्रीडा संकुलात करण्यात आले. 
या वेळी आमदार स्मिता वाघ, आमदार चंदूलाल पटेल, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, प्रभारी महापौर ललित कोल्हे, प्रा.डॉ. अस्मिता पाटील, डॉ. पंकज गुजर, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, फुटबॉल संघटनेचे सचिव फारुक शेख, इम्तियाज शेख, डॉ. अनिता कोल्हे, ताहेर शेख उपस्थित होते. 
निकाल पुढीलप्रमाणे, मुली - ए.टी.झांबरे वि.वि. पोदार स्कूल २ -०, ओरियन इंग्लिश स्कूल वि.वि. चौबे विद्यालय १ -०, मू.जे. महाविद्यालय वि.वि. डॉ. उल्हास पाटील स्कूल, भुसावळ, जैन स्पोर्ट्स वि.वि. ओरियन इंग्लिश स्कूल ७-०, ए.टी. झांबरे विद्यालय वि.वि. डॉ. बेंडाळे महाविद्यालय १ -०, रायसोनी इंग्लिश स्कूल वि.वि. झिपरू अण्णा विद्यालय १ -०,  मुले - ओरियन स्कूल वि.वि. नूतन मराठा महाविद्यालय - २ -०, बाहेती महाविद्यालय वि.वि. ओरियन सी.बी.एस.ई १०-०, झिपरू अण्णा विद्यालय वि.वि. शारदा माध्यमिक विद्यालय १-०,  इकरा शाहिन स्कूल  वि.वि. रायसोनी इंग्लिश स्कूल, इकरा पब्लिक स्कूल  वि.वि.रायसोनी मराठी शाळा ४-०, अक्सा बॉईज् वि.वि. ताप्ती पब्लिक स्कूल २ -०, ओरियन इंग्लिश स्कूल वि.वि. उल्हास पाटील स्कूल भुसावळ २ -१, बाहेती महाविद्यालय वि.वि. डॉ. उल्हास पाटील स्कूल, सावदा १ -०, विद्या इंग्लिश स्कूल वि.वि. मिल्लत हायस्कूल २ -०, अँग्लो उर्दू स्कूल वि.वि. इकरा शाहीन ५ -०, अनुभूती इंटरनॅशनल वि.वि. उज्ज्वल स्प्राऊटर ३ -०, बाहेती महाविद्यालय वि.वि. अक्सा बॉईज् ५ -०, इकरा पब्लिक स्कूल वि.वि. ओरियन स्टेट बोर्ड स्कूल १ -०, जैन स्पोर्ट्स अकॅडमी वि.वि. विद्या स्कूल ७ -०, अनुभूती इंटरनॅशनल वि.वि. अँग्लो उर्दू स्कूल ५ -०, जैन स्पोटर््स अकॅडमी वि. वि. झिपरू अण्णा विद्यालय ६ -०.

स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू 
मुली - प्राजक्ता पाटील, झांबरे विद्यालय, दीपाशा जामोदकर ओरियन स्कूल, पूजा नेमाडे, मू.जे. महाविद्यालय, रोहिणी बारी जैन स्पोर्ट्स अकॅडमी, वैष्णवी चव्हाण ए.टी. झांबरे, अंशिता गायकवाड, रायसोनी स्कूल.

मुले - आकाश कांबळे, ओरियन स्कूल, निखिल मुंदडा बाहेती महाविद्यालय, संजय कास्टेकर झिपरू अण्णा विद्यालय, अक्रम शेख इकरा शाहीन स्कूल, तहा शेख अक्सा बॉईज्, अल्तमश खान ओरियन स्कूल, सौरभ पाटील बाहेती महाविद्यालय, आसिफ हलदार अँग्लो उर्दू स्कूल, प्रसन्न नीळे विद्या स्कूल, अभंग जैन अनुभूती स्कूल, तेजस यादव, अखलाक शेख इकरा स्कूल, तरंग जैन अनुभूती स्कूल, फराज खान, धनंजय धनगर जैन स्पोर्ट्स अकॅडमी.

Web Title: jain sports,m.j. reach in semi final

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.