रत्नापिंप्री गावात पावसासाठी जलाभिषेक
By admin | Published: July 7, 2017 03:01 PM2017-07-07T15:01:19+5:302017-07-07T15:01:19+5:30
पर्जन्य याग यज्ञासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे केले आयोजन
Next
आॅनलाईन लोकमत
रत्नापिंप्री, जि.जळगाव,दि.७ - गेल्या काही दिवसांपासून रत्नापिंप्री व परिसरात पाऊस नसल्याने शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. समाधानकारक पाऊस व्हावा यासाठी पर्जन्य याग यज्ञासह विविध धार्मिक कार्यक्रम केले जात आहेत.
रत्नापिंप्रीत पर्जन याग यज्ञासह शुक्रवारी सकाळपासून गायत्री चौकात श्री स्वामी समर्थ गृपतर्फे विशेष यज्ञ व वेद पठन करण्यात येत आहे. गावातील मारूती मंदिरातील मूर्तीला जलाभिषेक करण्यात आला. रत्नापिंप्री, दबापिंप्री, होळपिंप्री येथील शेकडो महिलांनी या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होत गावातून मिरवणूक काढली. गावातील पाच मारूती मंदिरातील मूर्तीला जलाभिषेक करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांतर्फे पावसासाठी मारोती देवाला साकडे घालण्यात आले
रत्नापिंप्री परिसरावर तिबार पेरणीचे संकट
रत्नापिंप्रीसह दबापिंप्री, होळपिंप्री परीसरात यावर्षी खरीप हंगामातील लावणी व पेरण्या पावसाअभावी एकदा नव्हे दोनदा वाया गेली आहे. यामुळे परिसरातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला तरी देखील परीसरातील शेतकºयांची पिके नष्ट होत आहे. शुक्रवारी रत्नापिंप्रीसह दबापिंप्री, होळपिंप्री येथील शेतकरी तहसीलदार व कृषी अधिकारी यांना पारोळा येथे निवेदन देण्यात आले. शेतक-यासाठी मदत करावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी सरपंच प्रमिला भिल,उपसरपंच सुरेश पाटील, रामकृष्ण पाटील, ग्रा.पं.सदस्य सुरेश पाटील ,सुकलाल मनोरे, साहेबराव पाटील, भिकनराव पाटील ,अनिल पाटील, सतिश पाटील, कांतीलाल कोळी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.