जळगावात राष्ट्रसंत आचार्य श्री प.पू. १००८ श्री आनंदऋषीजी यांची जयंती उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 12:07 PM2018-08-13T12:07:20+5:302018-08-13T12:10:09+5:30
‘गुरु आनंद’द्वारे आचार्यश्रींना अभिवादन
जळगाव : राष्ट्रसंत आचार्य श्री प.पू. १००८ श्री आनंदऋषीजी म.सा. यांची ११८वी जयंती रविवारी विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी विविध धार्मिक कार्यक्रम झाले व संध्याकाळी गुरु आनंद या कार्यक्रमात सादर विविध गीतांनी आचार्यश्रींना अभिवादन करण्यात आले.
राष्ट्रसंत आचार्य श्री प.पू. १००८ श्री आनंदऋषीजी म.सा. यांच्या जन्मजयंतीनिमित्त १२ रोजी श्री स्थानकवासी जैन श्रावक संघ व जय आनंद ग्रुप यांच्यावतीने प.पू. कानमुनीजी म.सा. व प.पू. अमृतमुनीजी म.सा. यांच्या सान्निध्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सामाईक, आनंद चालिसा वाचन, गुणाणूवाद सभा असे कार्यक्रम होऊन गुरुभगवंत यांचे प्रवचन झाले.
संध्याकाळी कांताई सभागृहात सकल जैन समाजातील सर्व मंडळाद्वारे गुरु आनंद समूह गीत गायन स्पर्धा झाली. श्री वर्धमान स्थानकवासी संघ, जय आनंद ग्रुप यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आचार्यश्रींच्या जीवनावर आधारीत विविध गीत सादर करण्यात आले.
संघपती दलुभाऊ जैन, शाकाहार सदाचारचे प्रणेता रतनलाल बाफना, विजया मल्हारा, स्वरुप लुंकड, राजेंद्र लुंकड आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अजित कोठारी, अनिल कोठारी, सोनल कुमट यांनी केले. यशस्वीतेसाठी जय आनंद ग्रुपचे अध्यक्ष मयूर कोठारी, सचिव संजय भंसाली यांच्यासह सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.