जळगावात पहिली ते आठवीची 12 लाख 70 हजार पुस्तके दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2017 05:11 PM2017-05-18T17:11:06+5:302017-05-18T17:11:06+5:30
जि.प. व अनुदानीत शाळांमधील विद्याथ्र्यांना मोफत वितरणासाठी 26 लाख 82 हजार 357 पुस्तकांची आवश्यकता आहे,
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 18 - जि.प. व अनुदानीत शाळांमधील विद्याथ्र्यांना मोफत वितरणासाठी 26 लाख 82 हजार 357 पुस्तकांची आवश्यकता आहे, त्यापैकी 12 लाख 70 हजार पुस्तके प्राप्त झाली आहेत. यातच यंदा सातवीचा अभ्यासक्रम बदलल्याने या अभ्यासक्रमाची पुस्तके अद्यापही पाठय़पुस्तक भंडार, औरंगाबाद येथून प्राप्त झालेली नसल्याची माहिती आहे.
पहिली ते 8वीच्या विद्याथ्र्याना या पुस्तकांचे वितरण केले जाते. त्यासंबंधीची सविस्तर माहिती मागणी पत्रात पाठय़पुस्तक भंडारकडे करण्यात आली होती.
जिल्हाभरात 26 लाख 82 हजार 357 पुस्तकांची गरज आहे. जि.प.च्या 1843 शाळांमध्ये ही पुस्तके दिली जातील. याशिवाय अनुदानीत प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्येही या पुस्तकांचे वितरण करावे लागेल.
अद्याप 12 लाख 70 हजार 764 पुस्तके प्राप्त झाली आहेत. उर्वरित पुस्तके येत्या 10 ते 12 दिवसात प्राप्त होतील, असे जि.प.च्या शिक्षण विभागातर्फे सांगण्यात आले. अर्थातच एकूण मागणी लक्षात घेता अद्याप 48 टक्के पुस्तकांचा पुरवठा जिल्हाभरात ठिकठिकाणी झाला आहे.
जि.प.च्या शाळांमध्ये 15 जून म्हणजेच शाळेच्या पहिल्या दिवशीच या पुस्तकांचे वितरण करणे बंधनकारक आहे.
गणित, इंग्रजीची पुस्तके पुरेशी येत नसल्याच्या तक्रारी काही गटविकास अधिकारी कार्यालयांनी वरिष्ठ कार्यालयाकडे दिल्याची माहिती आहे.
औरंगाबाद येथील पाठय़पुस्तक भंडारकडून पुस्तके थेट तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी कार्यालयात येत आहेत. पण ही पुस्तके अद्यापही याच कार्यालयात पडून आहेत. त्यांचे वितरण झालेले नसल्याची माहिती आहे.