जळगाव : श्री. क्षेत्र वालझिरीसह पांडव मंदिरासाठी दीड कोटींचा निधी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 03:10 PM2023-04-04T15:10:28+5:302023-04-04T15:10:42+5:30

प्रादेशिक पर्यटन विकास विभागाकडून निधी उपलब्ध करून देण्यात आला.

Jalgaon 1.5 crore fund for Pandava temple with area Walziri tourism department | जळगाव : श्री. क्षेत्र वालझिरीसह पांडव मंदिरासाठी दीड कोटींचा निधी

जळगाव : श्री. क्षेत्र वालझिरीसह पांडव मंदिरासाठी दीड कोटींचा निधी

googlenewsNext

कुंदन पाटील

जळगाव: रामायणकर वाल्मिक ऋषींच्या पावन वास्तव्याने पुनित श्री.क्षेत्र वालझिरीसह पांडवांच्या वास्तव्य लाभलेले पाच पांडव मंदिरासाठी अनुक्रमे एक कोटी व ५० लाखांचा निधी प्रादेशिक पर्यटन विकास विभागाकडून उपलब्ध झाला आहे. 

यापूर्वी जळगाव लोकसभस मतदारसंघात श्रीक्षेत्र वटेश्वर आश्रम वडगाव लांबे, श्रीक्षेत्र बगळीदेवी मंदिर सायगाव, श्रीक्षेत्र सिद्धेश्वर आश्रम बेलदारवाडी, श्री क्षेत्र ऋषीपांथा बहाळ तसेच कला महर्षी के की मूस कलादालन या क्षेत्रांसाठी तत्कालीन आमदार उन्मेश पाटील यांनी निधी उपलब्ध केला होता. 

या क्षेत्रांसाठी निधी
श्री.क्षेत्र वालझिरी ता.चाळीसगाव येथे तीर्थक्षेत्राचा पर्यटन निधीतून विकासासाठी १ कोटी, चाळीसगाव येथील रेणुका माता मंदिर चाळीसगाव मंदिरासाठी १५ लाख, चाळीसगाव येथील गणेश मंदिरासाठी १० लाख, कराडी ता. पारोळा येथील खंडेराव महाराज मंदिरासाठी १ कोटी , तसेच दरेगाव ता. चाळीसगाव येथील धनाई पुनाई माता मंदिरासाठी ३० लाख, बोळे ता.पारोळा येथील खंडेराव मंदिरासाठी १ कोटी, टिटवी ता. पारोळा येथील श्री.क्षेत्र पाच पांडव मंदिरासाठी ५० लाख,  गिरड ता. भडगाव येथील श्री.क्षेत्र चतुर्भुज नारायण मंदिरासाठी ५० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

Web Title: Jalgaon 1.5 crore fund for Pandava temple with area Walziri tourism department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव