जळगावात सरासरीपेक्षा 18 टक्के कमी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 04:18 PM2017-08-03T16:18:58+5:302017-08-03T16:26:13+5:30
जळगाव तालुक्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत 18 टक्के कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतक:यांसह सर्वसामान्यांना पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
ठळक मुद्देगेल्या वर्षाच्या तुलनेत 18 टक्के पाऊस कमीयंदा अजूनही समाधानकारक पाऊस नाहीगिरणा नदी अजूनही कोरडीच
ऑनलाईन लोकमत जळगाव, दि.3 - भारतीय हवामान खात्याकडून यंदा समाधानकारक पाऊस होण्याचा अंदाज होता. मात्र अद्याप तालुक्यात 31 जुलैअखेर सरासरीच्या 18 टक्के कमी पाऊस झाल्याची माहिती जैन हिल्स हवामान विभागाचे संशोधक डॉ.बालकृष्णन यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. यंदा तालुक्यासह अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. जून महिन्यात पावसाने पाठ फिरविल्यामुळे शेतक:यांना दुबार पेरणी करावी लागली. जुलै महिन्यात पावसाने हजेरी लावली असली तरी गिरणा नदी अद्याप कोरडीच आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात तरी समाधानकारक पावसाची अपेक्षा शेतक:यांकडून होत आहे.