जळगावात दसऱ्याला ५१ फुटी रावणाचे होणार दहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 12:18 PM2018-10-14T12:18:34+5:302018-10-14T12:20:31+5:30

प्रतिकृती तयार होणार

In Jalgaon, 51 feet of water will be made to dawn | जळगावात दसऱ्याला ५१ फुटी रावणाचे होणार दहन

जळगावात दसऱ्याला ५१ फुटी रावणाचे होणार दहन

Next
ठळक मुद्देरावण दहनाच्या तयारीला सुरुवात शहरवासीयांमध्ये मोठी उत्सुकता

जळगाव : विजयादशमीला करण्यात येणा-या रावण दहनाच्या तयारीला सुरुवात झाली असून एल.के. फाउंडेशनच्यावतीने ५१ फुटी रावणाच्या प्रतिकृतीचे मेहरुण चौपाटीवर जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्याहस्ते दहन करण्यात येणार आहे.
दरवर्षी मेहरूण चौपाटीवर करण्यात येणा-या रावण दहनाची शहरवासीयांमध्ये मोठी उत्सुकता असते. त्यानुसार यंदाही या कार्यक्रमाच्या तयारीला एल.के. फाउंडेशनतर्फे सुरुवात झाली आहे. त्यानुसार १८ रोजी सायंकाळी रावण दहन होणार आहे.
या वेळी आमदार सुरेश भोळे, चंदूलाल पटेल, महापौर सीमा भोळे. एल.के. फाउंडेशनचे अध्यक्ष ललित कोल्हे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ललित कोल्हे यांच्या संकल्पनेतून रावणाची प्रतिकृती साकारली जात असून राजेश नाईक हे रविवारपासून प्रतिकृती तयार करण्यास सुरुवात करणार आहेत.
१५० व्यक्ती बसू शकतील एवढे मोठे व्यासपीठ मेहरुण चौपाटीवर उभारले जाणार असून त्यासाठी स्वयंसेवक कार्यरत राहणार आहेत. वाहतूक सुरळीत राहण्याच्या दृष्टीने बॅरिकेड्सदेखील लावण्यात येणार आहे. पार्कींगची व्यवस्था करण्यात येणार आहे. येथे प्रचंड गर्दी होत असल्याने वाहतूक पोलिसांची येथे नियुक्ती करावी, अशी अपेक्षा आहे.
५०० प्रकारचे फटाके
आतशबाजीसाठी ५०० ते ६०० प्रकारच्या फटाक्यांचा वापर करण्यात येणार आहे. शहरवासीयांनी लाभ घ्यावा, आवाहन ललित कोल्हे यांनी केले आहे.

Web Title: In Jalgaon, 51 feet of water will be made to dawn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.