Jalgaon: बांभोरीतील ६७ वाहनांना सव्वा आठ लाखांचा दंड! आरटीओंची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 05:28 PM2023-08-24T17:28:08+5:302023-08-24T17:30:06+5:30
Jalgaon: महसुल, पोलीस व आरटीओ प्रशासनाने वाळू जप्तीसाठी बांभोरीत केलेल्या कारवाईत ६७ वाहनांना ताब्यात घेण्यात आले होते. या वाहनांची आरटीओ कार्यालयाकडून तपासणी करुन विविध कलमान्वये ८ लाख १७ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.
- कुंदन पाटील
जळगाव - महसुल, पोलीस व आरटीओ प्रशासनाने वाळू जप्तीसाठी बांभोरीत केलेल्या कारवाईत ६७ वाहनांना ताब्यात घेण्यात आले होते. या वाहनांची आरटीओ कार्यालयाकडून तपासणी करुन विविध कलमान्वये ८ लाख १७ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. दरम्यान, जळगाव तहसीलदारांनीही संबंधितांना नोटिसा बजावल्या आहेत.
वाहनांची तंदुरुस्ती (कलम ५६/१९२), परवान्याविना वाहतूक (६६/१९२), विनानोंदणीकृत (३९/१९२) आणि पीयुसीचा (११५/१९०) दाखला नसल्याच्या कारणाने ही कारवाई करण्यात आली आहे. या चारही कलमांखाली ४ ते १० हजारांपर्यंत दंड ठोठावण्यात आला आहे. या वाहनांमध्ये सर्वाधिक ट्रॅक्टर्सचा समावेश आहे. शेतीकामासाठी असलेल्या ट्रॅक्टरचा व्यावसायिक वापर केल्याचेही उघड झाल्याने त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे.
३६ जणांना नोटिसा
वाहनासह दाराशी वाळूसाठा आढळलेल्या ३६ जणांना धरणगाव तहसीलदारांनी नोटिसा बजावल्या आहेत. वाळू उपसा करण्यासाठी सध्या बंदी असताना हा साठा कुठून उपलब्ध केला, याची विचारणा करण्यात आली आहे. समाधानकारक उत्तर मुदतीत न मिळाल्यास कारवाई करण्याचा इशारा तहसीलदारांनी दिला आहे.