Jalgaon: अमळनेरच्या बोरी नदीला अचानक पूर, सात्रीसह चार गावांचा संपर्क तुटला 

By संजय पाटील | Published: September 22, 2023 11:19 AM2023-09-22T11:19:48+5:302023-09-22T11:20:04+5:30

Jalgaon: गुरुवारी झालेल्या पावसामुळे अमळनेरच्या  बोरी नदीला अचानक आलेल्या पुरामुळे नदी काठावरील नागरिक चांगलेच भांबावले.  अमळनेर तालुक्यातील सात्री, कन्हेरे, बिलखेडे, फापोरे खुर्द तर पारोळा तालुक्यातील भिलाली या गावांचा अमळनेरशी संपर्क तुटला होता.

Jalgaon: A sudden flood in Bori river of Amalner cut off the connectivity of four villages including Satri | Jalgaon: अमळनेरच्या बोरी नदीला अचानक पूर, सात्रीसह चार गावांचा संपर्क तुटला 

Jalgaon: अमळनेरच्या बोरी नदीला अचानक पूर, सात्रीसह चार गावांचा संपर्क तुटला 

googlenewsNext

- संजय पाटील

जळगाव - गुरुवारी झालेल्या पावसामुळे अमळनेरच्या  बोरी नदीला अचानक आलेल्या पुरामुळे नदी काठावरील नागरिक चांगलेच भांबावले.  अमळनेर तालुक्यातील सात्री, कन्हेरे, बिलखेडे, फापोरे खुर्द तर पारोळा तालुक्यातील भिलाली या गावांचा अमळनेरशी संपर्क तुटला होता.

बोरी नदीला मध्यरात्री अचानक पूर आला आहे. रात्री प्रवाहाचे प्रमाण जास्त असल्याने भिलाली येथील पुलावरून पाणी वाहत होते. कन्हेरे येथील पुलावरून दोन तीन फूट पाणी वाहत असल्याने सकाळपर्यंत कन्हेरे, बिलखेडे ,फापोरे खुर्द या गावांचा संपर्क तुटला होता.

अमळनेर तालुक्यातील सात्री गाव जणू काही शापित आहे. पूल आणि रस्ता नसल्याने या गावाचा संपर्क जगाशी तुटतो. नदीला पूर आल्याने जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक शाळेत पोहचू शकले नाहीत तर शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी अमळनेर ला येऊ शकले नाही. ग्रामसेवक ,तलाठी देखील गावात पोहचू शकले नाही. 

पूर्व सूचना नाही नागरिक संतप्त !
प्रचंड पाऊस अथवा धरणाचे पाणी सोडल्यास नदी काठावरील लोकांना सतर्क करण्यासाठी संबंधित  विभागाकडून अलर्ट दिला जातो ,सायरन वाजवून सावध केले जाते. गावात दवंडी दिली जाते. मात्र याबाबत प्रशासनालाच काहीच माहिती नसल्याने नागरिकांनी नाराजी आणि संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Web Title: Jalgaon: A sudden flood in Bori river of Amalner cut off the connectivity of four villages including Satri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.