Jalgaon: केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ जळगावात ‘आप’ची निदर्शने
By विलास बारी | Published: March 22, 2024 09:49 PM2024-03-22T21:49:05+5:302024-03-22T21:49:38+5:30
Jalgaon News:नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने चौकशीच्या नावाखाली अटक करून चुकीच्या पद्धतीने कारवाई केल्याचा आरोप आम आदमी पार्टीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी केला.
- विलास बारी
जळगाव - नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने चौकशीच्या नावाखाली अटक करून चुकीच्या पद्धतीने कारवाई केल्याचा आरोप आम आदमी पार्टीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी केला. ईडीसह केंद्र शासनाचा निषेध करण्यासाठी ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी महानगराध्यक्ष अमृता नेतकर, ॲड. विजय दाणेज, सीमा बिर्ला, दीपक माने, राजू निकम, नाजीम कुरेशी, इरफान शेख, ओटा राया वळवी यांच्यासह कार्यकर्त्यांनी केंद्र शासनाविरोधात घोषणाबाजी केली. लोकसभा निवडणुकीपासून ‘आप’सारख्या राष्ट्रीय पक्षाला दूर ठेवण्यासाठी केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. ही अटक बेकायदेशीर असल्याचा आरोपी यावेळी करण्यात आला. ‘आप’च्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन सादर केले.