Jalgaon: अतिरिक्त ठरलेल्या प्राध्यापकांचे विद्यापीठात आंदोलन
By अमित महाबळ | Published: March 23, 2024 07:31 PM2024-03-23T19:31:41+5:302024-03-23T19:32:14+5:30
Jalgaon: विद्यापीठाच्या भाषाशास्त्र प्रशाळेत पदे रिक्त असून, त्या ठिकाणी समायोजन करण्यात यावे या मागणीसाठी अतिरिक्त ठरलेल्या दोन प्राध्यापकांनी शनिवारी (दि.२३) विद्यापीठात अधिसभा सुरू असताना सभागृहाच्या बाहेर घोषणाबाजी करत आंदोलन केले.
- अमित महाबळ
जळगाव - विद्यापीठाच्या भाषाशास्त्र प्रशाळेत पदे रिक्त असून, त्या ठिकाणी समायोजन करण्यात यावे या मागणीसाठी अतिरिक्त ठरलेल्या दोन प्राध्यापकांनी शनिवारी (दि.२३) विद्यापीठात अधिसभा सुरू असताना सभागृहाच्या बाहेर घोषणाबाजी करत आंदोलन केले.
प्रा. रमेश पाटील (धानोरा, ता. नंदुरबार) आणि रामेश्वर बंजारा (कोठली खुर्द, ता. नंदुरबार) यांनी हे आंदोलन केले. त्यांनी विद्यापीठाला पत्र दिले असून, छत्रपती संभाजीनगर येथील विद्यापीठ न्यायाधिकरण व खंडपीठाच्या आदेशानुसार समायोजनाची प्रक्रिया करावी, अशी मागणी केली आहे.
अतिरिक्त ठरलेल्यांची यादी एकच असायला हवी. ही यादी तयार करण्याचे काम विद्यापीठाचे आहे. ‘मी स्वत: मराठी व बंजारा इंग्रजी विषयाचे प्राध्यापक आहेत. विद्यापीठातील भाषाशास्त्र प्रशाळेत या दोन्ही विषयाची पदे रिक्त आहेत. त्यावर आमचे समयोजन करावे’, अशी मागणी असल्याचे रमेश पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आंदोलनादरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दोन्ही प्राध्यापकांची मागण्यांचे फलक आपल्या गळ्यात अडकवले होते.
पण आवाज पोहचू शकला नाही...
आंदोलन करणारे दोन्ही प्राध्यापक सुरुवातीला व्यवस्थापन परिषद सभागृहाच्या ठिकाणी गेले. तेथे बराच वेळ थांबले पण सभेची चिन्हे दिसत नव्हती. सिनेट सभागृहात सभा सुरू झाल्याची माहिती मिळल्यानंतर हे दोघेही वरच्या मजल्यावरून खाली आले. तोपर्यंत सिनेटची सभा सुरू होऊन गेली होती. बाहेर त्यांचे आंदोलन सुरू असताना दरवाजे बंद असल्याने त्यांचा आवाज आतपर्यंत पोहोचू शकला नाही.