जळगावात वायुसेनेच्या भरतीत खासदार ए़.टी.पाटलांनीही मोजली आपली उंची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 02:12 PM2017-11-07T14:12:34+5:302017-11-07T14:14:04+5:30
शहरातील एकलव्य मैदानावर राज्यातील २३ जिल्ह्यासाठी वायुसेनेच्या भरतीप्रक्रियेला मंगळवारी सकाळी ६ वाजता सुरुवात झाली़ या भरतीप्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी आलेल्या खासदार ए़टी़पाटील यांनी भरतीत सहभागी उमेदवाराप्रमाणे स्वत:चीही उंची मोजून घेतली़ एवढेच नव्हे तर प्रसारमाध्यमांना खास पोजही दिली.
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि़७ -शहरातील एकलव्य मैदानावर राज्यातील २३ जिल्ह्यासाठी वायुसेनेच्या भरतीप्रक्रियेला मंगळवारी सकाळी ६ वाजता सुरुवात झाली़ या भरतीप्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी आलेल्या खासदार ए़टी़पाटील यांनी भरतीत सहभागी उमेदवाराप्रमाणे स्वत:चीही उंची मोजून घेतली़ एवढेच नव्हे तर प्रसारमाध्यमांना खास पोजही दिली. त्यांच्या या चमकोगिरीने उमेदवारांसह वायुसेनेचे अधिकारी आश्चर्यचकित झाले.
राष्टÑीय महामार्गालगत असलेल्या केसीई संस्थेच्या एकलव्य मैदानावर आॅटोमोबाईल टेक्निशियन, ग्राऊंड ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर, आयएएफ या पदासाठी दोन दिवसीय भरती प्रक्रियेला मंगळवारी प्रारंभ झाला. सकाळी ९ वाजेच्या सुमारास खासदार ए़टी़पाटील या हे आपल्या कार्यकर्त्यांसह भरती प्रकियेचा आढावा घेण्यासाठी मैदानात दाखल झाले़ आमदार सुरेश भोळे, मनपाचे सुनील माळी,नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे सोबत होते़ यानंतर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्रीमती व्ही़व्ही़रत्नपारखी, वायुसेनेचे अधिकारीअधिकाºयांकडून त्यांनी भरतीच्या विविध टप्प्यांबाबत माहिती जाणून घेतली.
इन्फो-
मीही भरती झालो होता २२मात्र...
उंची मोजण्यापूर्वी आमदार भोळे यांना खासदार पाटील म्हणाले, मी तरुण असताना मी ही भरती झालो होतो़ मात्र कौटुंबीक अडचणीमुळे जावू शकलो नाही़ नाही तर आज मोठ्या पदावर राहिला असतो़ त्यावर आमदार भोळे यांनी जर तुम्ही भरती झाले असते, आम्हाला तुमचा राजकीय सहवास लाभला नसता, अशी फिरकी घेतली.