आशियातील सर्वोत्कृष्ट संस्थांमध्ये बहिणाबाई चौधरी विद्यापीठाचा समावेश

By अमित महाबळ | Published: June 20, 2024 04:53 PM2024-06-20T16:53:26+5:302024-06-20T16:56:17+5:30

आशियातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांची क्रमवारी (रँकिंग) ‘स्टडी अब्रॉड एड’ संस्थेने जाहीर केली असून, यामध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा समावेश झाला आहे.

jalgaon bahinabai chaudhari university included among the best institutions in asia | आशियातील सर्वोत्कृष्ट संस्थांमध्ये बहिणाबाई चौधरी विद्यापीठाचा समावेश

आशियातील सर्वोत्कृष्ट संस्थांमध्ये बहिणाबाई चौधरी विद्यापीठाचा समावेश

अमित महाबळ, जळगाव : आशियातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांची क्रमवारी (रँकिंग) ‘स्टडी अब्रॉड एड’ संस्थेने जाहीर केली असून, यामध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा समावेश झाला आहे. या क्रमवारीत विद्यापीठाचा समावेश झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर विद्यापीठाची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे.

या संस्थेने आशियातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांची क्रमवारी जाहीर केली आहे. जगातील विद्यापीठांचा व्यापक डेटाबेस या संस्थने प्राप्त केला. त्यामध्ये आठ हजारपेक्षा अधिक संस्थांचा समावेश होता. जगभरातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या कोणत्या शैक्षणिक संस्था आहेत याची माहिती व्हावी व पैशांचे मूल्य कळावे आणि त्यांनी प्रवेशासाठी या विद्यापीठांचा विचार करावा या हेतूने या संस्थेद्वारे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये आशिया खंडातील ३,३४९ उच्च शैक्षणिक संस्थांचे मूल्यमापन करून या संस्थेने क्रमवारी जाहीर केली. या संस्थांपैकी ३० टक्के उत्कृष्ट विद्यापीठांमध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने स्थान प्राप्त केल्याचे जाहीर केले आहे.

कमी शुल्कात गुणवत्तापूर्ण शिक्षण...

क्रमवारीसाठी जे निकष होते त्यामध्ये शैक्षणिक गुणवत्तेसाठी ७५ टक्के आणि शैक्षणिक शुल्क खर्चासाठी २५ टक्के गुण होते. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून कमी शुल्कात गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जात असल्यामुळे या क्रमवारीत विद्यापीठाचा समावेश झाला आहे.

विद्यापीठाची वेगळी ओळख तयार...

कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठामार्फत विद्यार्थीभिमुख उपक्रम राबविले जातात. जागतिक पातळीवरील स्पर्धेचे भान लक्षात ठेवून अभ्यासक्रमांची रचना, प्लेसमेंट, विद्यार्थी सुविधा, पायाभूत सोयी आदींवर भर दिला जात असल्यामुळे या विद्यापीठाने वेगळी ओळख निर्माण केली आहे. १५ दिवसांपूर्वी ‘द वीक’ या इंग्रजी नियतकालिकाने भारतातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या केलेल्या सर्वेक्षणात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने बहुविद्याशाखीय विद्यापीठ गटात ५० वे तर पश्चिम विभागीय विद्यापीठाच्या गटात ९ वे स्थान प्राप्त केले होते.

Web Title: jalgaon bahinabai chaudhari university included among the best institutions in asia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.