महसुली वसुलीत जळगाव, बोदवड पिछाडीवर; पुढील २ दिवस वसुलीचं मोठं आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2023 04:45 PM2023-03-28T16:45:59+5:302023-03-28T16:46:22+5:30
२०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी जमीन महसुलीबोटी ५६ कोटी तर गौण खनीज वसुलीपोटी ७२ कोटींचे उद्दीष्ट देण्यात आले होते
कुंदन पाटील
जळगाव : शासकीय जमीन महसुल व गौण खनीजपोटी २३ मार्चपर्यंत झालेल्या वसुलीत जळगाव आणि बोदवड तालुका पिछाडीवर आहे.त्यामुळे ३१ मार्चपूर्वी अर्थात दोन दिवसात दोन्ही तहसील कार्यालयांना वसुलीसाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.
२०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी जमीन महसुलीबोटी ५६ कोटी तर गौण खनीज वसुलीपोटी ७२ कोटींचे उद्दीष्ट देण्यात आले होते. त्यापैकी दि.२३ मार्चपर्यंत जमीन महसुलपोटी सुमारे ३२ कोटींची तर गौण खनीजापोटी ६१ कोटींची वसुली करण्यात आली आहे. या दोन्ही वसुलींची अनुक्रमे टक्केवारी ५६.९५ व ८५.१२ इतकी आहे. दोन्ही उद्दिष्टांपैकी ९३ कोटींची वसुली झाली आहे. येत्या तीन दिवसात ३५ कोटींची वसुली करण्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे.
तालुकानिहाय उद्दिष्ट, वसुली व टक्केवारी (लाखात)
तालुका - जमीन महसुल - वसुली - गौण खनिज - वसुली - दोघांची टक्केवारी
बोदवड - १२०.०० - ४६.७० - २०० - ९४.२० - ४४.०३
जळगाव - १५९०.०० - ५९१.९४ - ७७५ - ४०४.५२ - ४२.१३
भडगाव - १६०.०० - ७६.२४ - ३२५.०० - २०३.२४ - ५७.६२
चोपडा - ३९९.०० - १८२.३५ - ३००.०० - २०२.५६ - ५५.०७
अमळनेर - २४०.०० - १४९.७५ - ५७५.०० - ३६६.४० च ६३.३३
धरणगाव - १८०.०० - १४०.३९ - ६२५.०० - ४२५.७० - ७०.३२
चाळीसगाव - ६३६.०० - १९०.०६ - ९००.०० - ९०२.१४ - ७१.११
पारोळा - १२०.०० - ९०.४० - २२५.०० - १७३.१४ - ७६.३९
मुक्ताईनगर - २१२.०० - १७५.६६ - ३००.०० - २३८.८९ - ८०.९७
पाचोरा - ३००.०० - २३०.२५ - ५५७.०० - ४४०.०२ - ७८.२१
यावल - ३८३.०० - २२६.५१ - ३००.०० - ३६३.३२ - ८६.३६
भुसावळ - ४४०.०० - २२०.८७ - ६५०.०० - ८८७.८७ - १०१.७२
रावेर - ३४०.०० - २९६.५७ - २७५.०० - ३६७.६९ - १०८.०१
एरंडोल - १८०.०० - १२९.४५ - ६७५.०० - ६४६.२८ - ९०.७३
जामनेर - ३००.०० - ४४१.९० - ६००.०० - ४८२.४६ - १०२.७१
एकूण - ५६००.०० - ३१८९.०४ - ७२८२.०० - ६१९८.४३ - ७२.८७