जळगावात शिवजयंती महोत्सवानिमित्त काढलेल्या बुलेट रॅलीने वेधले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 12:19 PM2018-02-18T12:19:38+5:302018-02-18T12:23:43+5:30

‘शिवचरित्र’वर व्याख्यान

In the Jalgaon bullet rally celebration | जळगावात शिवजयंती महोत्सवानिमित्त काढलेल्या बुलेट रॅलीने वेधले लक्ष

जळगावात शिवजयंती महोत्सवानिमित्त काढलेल्या बुलेट रॅलीने वेधले लक्ष

Next
ठळक मुद्देश्रीपाद छिंदम यांच्या प्रतिकात्मक पुतळ््याचे दहनशिवजयंतीनिमित्त १९ रोजी विविध कार्यक्रम

आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि. १८ - शिवजयंती महोत्सवांतर्गत शनिवारी दुपारी शहरातून भव्य बुलेट रॅली काढण्यात आली. काव्यरत्नावली चौकातून सुरू झालेल्या या रॅलीस पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी झेंडी दाखविली. महापौर ललित कोल्हे यांनी स्वत: बुलेट चालवत रॅलीचे नेतृत्व केले. रॅलीमध्ये माजी नगरसेवक कैलास सोनवणे यांच्यासह मान्यवर व तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
श्रीपाद छिंदम यांच्या प्रतिकात्मक पुतळ््याचे दहन
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द काढणारे अहमदनगर येथील उपमहापौर श्रीपाद छिंदम यांच्या प्रतिकात्मक पुतळ््याचे समितीच्यावतीने शनिवारी आकाशवाणी चौकात दहन करण्यात आले.
युवकांनी शिवचरित्रातून प्रेरणा घ्यावी-डॉ. प्रताप जाधव
छत्रपती शिवाजी महाराज हे खºया अर्थाने रयतेचे राजे होते. त्यांच्यासारखा पुरुषोत्तम कर्तबगार राजा पुन्हा होणे नाही. युवकांनी शिवजागर करताना आदर्श शिवचरित्रातून प्रेरणा घ्यावी व रचनात्मक कार्य करावे, असे आवाहान सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे उपाध्यक्ष डॉ. प्रताप जाधव यांनी केले. नूतन मराठा महाविद्यालयात शनिवारी आयोजित शिवचरीत्र या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले, त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे ज्येष्ठ संचालक अ‍ॅड. डी.डी. पाटील होते. व्यासपीठावर समितीचे सचिव सुरेंद्र पाटील, संचालक किरण साळुंखे, संचालक दीपक सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा. डी.पी. पवार, प्रा. एस.डी. पाटील, मुकुंद सपकाळे, प्रा. आर.बी. देशमुख, प्रा. एस.डी. सुर्वे, किरण साळुंखे, प्रा. राजेंद्र देशमुख, प्रा. डी.पी. पवार, प्रा. सुनील गरूड, अ‍ॅड. अनिल पाटील, सचिन चव्हाण उपस्थित होते.
रॅलीने शहरातील वातावरण शिवमय
काव्यरत्नावली चौकातून बुलेट रॅलीला सुरूवात झाल्यानंतर छत्रपतींचा जयजयकार करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य कटआऊटने लक्ष वेधून घेतले. रॅलीमध्ये नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे, विनोद देशमुख, शंभू पाटील, मुुकुंद सपकाळे, पुरुषोत्तम चौधरी, सुरेंद्र पाटील, खुशाल चव्हाण, आबा कापसे आदी सहभागी झाले होते. या रॅलीने शहरातील वातावरण शिवमय झाले होते.
रविवारी भरगच्च कार्यक्रम
समितीच्यावतीने रविवार, १८ रोजी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले असून दुपारी चार वाजता काव्यरत्नावली चौकातून महिलांची रॅली काढण्यात येणार आहे. जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर या रॅलीचे नेतृत्व करणार आहेत. ही रॅली शहरातील प्रत्येक मंदिर, मशिद, चर्च, गुरुद्वारा येथे भेट देणार असून तेथे स्वागत केले जाणार आहे. महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संध्याकाळी सात वाजता पिंप्राळा येथील शिवाजी चौकात हभप सय्यद जलाल महाराज यांचे ‘संत तुकाराम, वेदांत, शिवाजी महाराज या विषयावर कीर्तन होणार आहे. उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.
शिवजयंतीनिमित्त १९ रोजी विविध कार्यक्रम
शिवआज्ञा प्रतिष्ठानतर्फे १९ रोजी शासकीय तंत्रनिकेतनपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ््यापर्यंत रॅली काढण्यात येणार आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री सुरेशदादा जैन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, गुलाबराव वाघ, महापौर ललित कोल्हे आदी उपस्थित राहणार आहेत.
जळगाव आर्ट सोसायटीतर्फे चित्रकला स्पर्धा
जळगाव आर्ट सोसायटीच्यावतीने राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी राज्यभरातून शिवरायांवर चित्र मागविण्यात आले असून त्यांचे १९ रोजी महात्मा गांधी उद्यानात प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. त्याचे उद््घाटन जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्याहस्ते होणार आहे.

Web Title: In the Jalgaon bullet rally celebration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.