जळगाव बसमध्ये पाकिट मारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 01:30 PM2017-08-10T13:30:09+5:302017-08-10T13:30:35+5:30
पिाकिटात रोख दोन हजार, एटीएम, पॅनकार्ड, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र अशी कागदपत्रे
Next
ठळक मुद्देचोरटय़ाने खिशातील पाकिट लांबविल़े
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 10 - मालेगाव मुक्ताईनगर एस.टी. बसमध्ये प्रवास करणा:या प्रवाशाचे पाकिट अज्ञात चोरटय़ाने लांबविल्याची घटना बुधवारी दुपारी 3.10 वाजता पारोळा बसस्थानकावर घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला़
चंद्रशेखर शंकर नांदेडकर (वय 60, रा़ गिताई नगर ) हे जळगाव येण्यासाठी ते पारोळा बसस्थानकावर मालेगाव मुक्ताईनगर (क्रमांक एम.एच. 20 बी.एल. 1770) या बसमध्ये चढले. यादरम्यान चोरटय़ाने त्यांच्या खिशातील पाकिट लांबविल़े पिाकिटात रोख दोन हजार, स्टेट बँकेचे एक एटीएम, आयसीआय बँकेचे एटीएम, पॅनकार्ड, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र अशी कागदपत्रे होती़ े