जळगावात उद्योजक पतीच्या छळाला कंटाळून पत्नीने तीन मुलांसह स्वत:ला कोंडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 10:54 PM2019-06-13T22:54:53+5:302019-06-13T22:58:15+5:30
गेल्या पंधरा दिवसापासून पतीकडून छळ होत असल्याने कंटाळलेल्या पत्नीने एक विवाहित मुलगी, तिचा दीड वर्षाचा मुलगा, अविवाहित मुलगी व मुलगा यांच्यासह स्वत:ला घरात कोंडून घेत तब्बल ९ दिवस अन्नत्याग केला. या परिवाराचे बरेवाईट होण्याची शक्यता लक्षात घेता पतीने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशाने कोंडलेल्या सर्वांची सुटका केल्याची घटना गुरुवारी दुपारी पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात घडली.
जळगाव : गेल्या पंधरा दिवसापासून पतीकडून छळ होत असल्याने कंटाळलेल्या पत्नीने एक विवाहित मुलगी, तिचा दीड वर्षाचा मुलगा, अविवाहित मुलगी व मुलगा यांच्यासह स्वत:ला घरात कोंडून घेत तब्बल ९ दिवस अन्नत्याग केला. या परिवाराचे बरेवाईट होण्याची शक्यता लक्षात घेता पतीने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशाने कोंडलेल्या सर्वांची सुटका केल्याची घटना गुरुवारी दुपारी पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात घडली.
दिनकर रामदास पाटील (६२) असे उद्योजकाचे नाव असून पत्नी वैशाली, मुलगा उमाकांत, मुलगी राजश्री, रेणुका व राजश्रीचा मुलगा आर्या (दीड वर्ष) असे कोंडून घेण्या-या परिवाराचे नाव आहे. दरम्यान, पोलिसांनी या सर्वांना बाहेर काढल्यानंतर आपण उपवास केला होता व स्वत:ला कोंडून घेतल्याचा इन्कार कुटुंबियांनी केला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात दिनकर रामदास पाटील हे पत्नी वैशाली, मुलगा उमाकांत, मुलगी रेणुका तसेच विवाहित मुलगी राजश्री या कुटुंबासह वास्तव्यास आहे. दिनकर रामदास पाटील यांची एमआयडीसी परिसरात रेणुका इंजिनिअरींग नावाची कंपनी असून मुलगा उमाकांत इंजिनिअर असल्याने तोही कामात मदत करतो. मात्र, वडीलांकडून होणाºया त्रासामुळे गेल्या दोन महिन्यांपासून तो घरीच आहे.
काय आहे नेमका विषय
दिनकर पाटील यांचा मुलगा उमाकांत पाटील व मुलगी रेणुका यांनी दिलेल्या माहितीनुसार,आई वैशाली यांना वडील दिनकर पाटील हे गेल्या पंधरा वर्षापासून कुठल्या ना कुठल्या कारणावरुन त्रास देतात, भांडण करतात, या भांडणातून त्यांनी अनेकदा आईला वडीलांनी मारहाणही केली, काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे भांडण झाले. अनेकदा त्यांना समजाविण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करुनही त्रास कमी होईना.वडीलांकडून होणाºया छळाच्या आॅडीओ तसेच व्हिडीओ क्लीप्सही आमच्याकडे असल्याचे मुलांचे म्हणणे आहे. या त्रासामुळे आम्ही नऊ दिवसांपासून घरातून बाहेर पडलो नाही, मात्र थोडे थोडे रोज जेवण केले असेही ते सांगत होते.